मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज (30 नोव्हेंबर) मोठा दिवस (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे. कारण आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारचा बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे. विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात येणार आहे. महाविकासाआघाडीने जवळपास 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे.
विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. यासाठी आज आणि उद्या दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आज दुपारी साधारण 2 च्या सुमारास सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.
या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. आज बहुमत दिन, 170+++, हमको मिटा सके ये जमाने में दम नही, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नही अशा गाण्याच्या ओळी ट्विट संजय राऊत यांनी ट्विट केल्या (Uddhav Thackeray Floor Test Today) आहेत.
आज
बहुमत दिन..
170+++++
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं,
हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2019
या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील सत्तानाट्य
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून राज्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला. यानंतर गेल्या शनिवारी 23 नोव्हेंबर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भल्या पहाटे सकाळी हा शपथविधी राजभवनात पार पडला. मात्र बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या 80 तासात राज्यात भाजप सरकार कोसळले.
यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी या नवीन आघाडीची घोषणा केली. तसेच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याशिवाय सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावाही महाविकासआघाडीने राज्यपालांकडे केला.
दरम्यान गुरुवारी (28 नोव्हेंबर) राज्यपालांनी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शपथ दिली. तसेच येत्या मंगळवारपर्यंत (3 डिसेंबर) विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे निर्देशही दिले होते.
उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी 2.30 च्या सुमारास मुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ग्रँड एण्ट्री केली. ‘मातोश्री’वरुन जवळपास दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयाकडे रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन मंत्रालयाकडे कूच केली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं.