राज्याकडून केंद्राकडे 14 हजार 600 कोटींची मागणी

| Updated on: Dec 17, 2019 | 4:38 PM

राज्य सरकारने पूरग्रस्त आणि अवकाळी ग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केली आहे.  महाराष्ट्रात पुरामुळे तसंच अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे.

राज्याकडून केंद्राकडे 14 हजार 600 कोटींची मागणी
Follow us on

नागपूर : राज्य सरकारने पूरग्रस्त आणि अवकाळी ग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केली आहे.  महाराष्ट्रात पुरामुळे तसंच अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे.  या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्राकडे जवळपास 15 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज विधानसभेत दिली. 

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 2100 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधीपक्षांनी केल्यानंतर, त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6600 कोटी रुपयांपैकी 2100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 7400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.