मुंबई: तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विधिमंडळाची 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यास विधानसभेनं मंजुरी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप आमदार अॅड. आशिष शेलार आणि नितेश राणे यांच्यासह एकूण 16 सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे. एएनआय या वृतसंस्थेने याबाबत ट्विट केलं आहे. वन राज्यमंत्री दत्ता भरणे (Dattatray Bharne) यांनी विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृक्ष लागवडीच्या मुद्द्यावरुन विधानसभेते घमासान पाहायला मिळाले. (Maharashtra Legislative Assembly approves constitution of a 16-member committee to look in allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt )
Maharashtra Legislative Assembly approves constitution of a 16-member committee to look into the allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt. The committee includes Nana Patole, Ashish Shelar, & Nitesh Rane.
— ANI (@ANI) March 10, 2021
वृक्ष लागवड हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली होती. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून खरेदी केली गेली, याची माहिती समोर आली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले होते.
वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी 2014 ते 2019 या कालावधीत 2 हजार 429 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालयाची धुरा होती.
संबंधित बातम्या:
भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा, फडणवीस विचारतात मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर
(Maharashtra Legislative Assembly approves constitution of a 16-member committee to look in allegations into 33-crore tree plantation drive under Fadnavis govt )