मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी राज्य सरकारने 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केलाय. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आर्थिक पॅकेजही जाहीर केलंय. हे पॅकेज म्हणजे गरीबांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आलीय. आता माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. (Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray on the backdrop of lockdown)
15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन केंद्र सुरु राहणार आहेत. शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. यावरुन निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार”, असं ट्वीट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केलीय.
शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार.
घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही.
रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका.
मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2021
त्याचबरोबर राज्यातील गरीब वर्गाला महिनाभरासाठी प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. काल ही घोषणा केल्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे भुजबळांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. त्यावरुनही निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय.
मंत्री छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजीना लिहिलेले पत्र बघा. १ महिना गरिबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदुळ द्यायची घोषणा केली आणि लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली. उद्या पासून राज्याचे मंत्री ७.४५ ची सोय पण केंद्राकडे मागतील, काय सांगता येत नाही. pic.twitter.com/Mp7HQXqFZa
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 14, 2021
मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनच्या अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचं जनतेला आवाहन केलंय. त्यावरूनच भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडलंय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोलाही नितेश राणेंनी लगावलाय.
“Break the Chain”
Nah..
“Check the Brain”
sounds better for Maha CM n His Ministers!— nitesh rane (@NiteshNRane) April 13, 2021
संबंधित बातम्या :
रोहित पवारांनी विरोधकांना दाखवला आरसा, भाजपशासित राज्यातील परिस्थिती सांगत राजकारण टाळण्याचं आवाहन
Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray on the backdrop of lockdown