मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (MLC Election live) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
मतांचं गणित पाहून काँग्रेसने दुसऱ्या जागेचा हट्ट सोडल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने चार जागांवर दावा केला आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडी पाच आणि भाजपच्या चार जागा निवडून येतील, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. (MLC Election live)
दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत. एकूण 9 जागांपैकी शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 1 तर भाजप 4 जागा लढवणार आहे.
Mumbai: Maharashtra CM Uddhav Thackeray files his nomination for the elections to State Legislative Council which is scheduled to be held on 21st May.
CM Uddhav Thackeray to become Member of Legislative Council unopposed. pic.twitter.com/cKpjcHa7Q0
— ANI (@ANI) May 11, 2020
MLC Election Live Update
LIVETV – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/29kxvGJR57
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
LIVETV – उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते विधानभवनात https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/AAel5P4uGF
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
भाजपचे उमेदवार
या निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले. भाजपने 4 जागांवर उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी देऊन अर्ज भरले आहेत.
मुख्यमंत्री उमेदवार
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या निवडणुकीत मुख्यमंत्री उमेदवार असतात ती बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. मात्र आता काँग्रेसने वाढीव जागा मागितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे – शिवसेना
निलम गोऱ्हे – शिवसेना
राजेश राठोड – काँग्रेस
राजकिशोर मोदी – काँग्रेस (अर्ज मागे)
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी
रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
गोपीचंद पडळकर – भाजप
प्रवीण दटके – भाजप
डॉ. अजित गोपछेडे – भाजप
विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम
(MLC Election live)
संबंधित बातम्या
MLC Polls : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसने 6 व्या जागेचा आग्रह सोडला
MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार