अकोला : केंद्रापाठोपाठ राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेल्या भाजपने सध्या महापालिका निवडणुकांचा गड आपल्याकडे राखण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही पश्चिम विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भाजपने विशेष भर दिल्याचे चित्र आहे. याचदरम्यान अकोला महापालिकेची निवडणूक (Akola Municipal Corporation Election) होत आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून भाजप (BJP)ने भक्कम रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भाच्या आपल्या बालेकिल्ल्यात विरोधकांची गणिते यशस्वी होऊ न देण्याचा निर्धारच भाजपने केल्याचे बोलले जात आहे. अकोला आणि परिसरात सहकाराचे जाळे विस्तारले आहे. याच सहकाराच्या माध्यमातून मतदारांवर आपली छाप पाडण्यात भाजपने यश मिळवले आहे. आता या जोरावर अकोला महापालिकेची सत्ता आपल्या हाती राखण्यास भाजपने आटोकाट प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मागील म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत भाजपने ‘मिशन अकोला‘ राबविले होते. त्यावेळी 80 पैकी 48 जागांवर विजय मिळवून भाजपने ‘मिशन अकोला’ (Mission Akola) फत्ते केले होते. त्याच विजयाने भाजपाला यंदाच्या निवडणुकीसाठी मोठा उत्साह लाभला आहे. त्यामुळे भाजप ‘मिशन अकोला’ची पुनरावृत्ती करतोय का? विरोधक भाजपाला बालेकिल्ल्यात आव्हान देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
भाजप | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
अकोला महापालिकेचे पूर्वी 20 प्रभाग होते. आता त्यात दहाची भर पडून एकूण 30 प्रभाग झाले आहेत. यापैकी 29 प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत, तर 30 वा प्रभाग चार सदस्यीय असणार आहे. पालिकेच्या सर्व 30 प्रभागांतून एकूण 91 सदस्य निवडून महापालिकेवर जाणार आहेत.
एकूण लोकसंख्या – 19118
अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 3111
अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लोकसंख्या – 395
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये सिंधी कॅम्प पक्की खोली, सिंधी कॅम्प कच्ची खोली, कैलास टेकडी, निमवाडी या प्रमुख विभागांचा समावेश होतो.
भारतीय जनता पक्ष – 48
राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 13
शिवसेना (SS) – 08
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – 05
भारिप बहुजन महासंघ (BBM) – 03
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) – 01
अपक्ष/इतर – 02
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
मागील निवडणुकीत महापालिकेवर सत्ता मिळवून कमाल करणारा भाजप यंदाच्या निवडणुकीत आपल्या पदरी आणखी जागा पाडून घेतो की, भाजपच्या बहुमताला काँग्रेस, शिवसेनेकडून धक्का दिला जातोय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.