पुणे : राज्याच्या राजकारणात मुंबईइतकेच महत्त्व असलेल्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari-Chinchwad Municipal Corporation)ही तितकीच महत्वाची आहे. या पालिकेची सत्ता (Power) आपल्या हाती मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पुण्याप्रमाणेच या महापालिकेमध्ये नागरी सुविधांवर वाढत्या लोकसंख्येचा भार वाढतो आहे. त्यामुळे इथले प्रश्न कोण सोडवणार, याचे गणित लक्षात घेऊन मतदार (Voter) आपला कौल देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्ष त्यांनी याआधी केलेल्या विकासकामांची यादीच घेऊन मतदारांपुढे जाणार आहेत. पालिकेवर सध्या भाजपची सत्ता होती. महापौर माई ढोरे यांनी सत्तेची सूत्रे यशस्वीरीत्या सांभाळली आहेत. या पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 31 मधील लढत देखील फार रंगतदार होणार आहे. भाजपचा मतदारांवरील प्रभाव कायम राहतोय कि विरोधक भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच अनुषंगाने या मतदारसंघाची रचना आणि राजकीय परिस्थितीचा आढावा येथे घेत आहोत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
एकूण लोकसंख्या – 39068
अनुसूचित जाती – 4453
अनुसूचित जमाती .- 450
वॉर्डमध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो?
राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डेनगर, विद्यानगर भाग, ऊरो रुग्णालय आदी विभागांचा वॉर्ड क्रमांक 31 मध्ये समावेश होतो. वॉर्डच्या उत्तर आणि पूर्व दिशेला पवना नदी आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
वॉर्ड क्रमांक 31 मध्ये मागील अर्थात 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, तर एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारून महापालिकेत एंट्री मिळवली होती. कांबळे अंबरानाथ चंद्रकांत(भाजप), राजापुरे माधवी राजेंद्र(भाजप), चौगुले सीमा दत्तात्रय(भाजप), जगताप नवनाथ दत्तू (अपक्ष) या उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यामुळेच हा वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
महापालिकेची यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. त्यानुसार अलिकडेच या वॉर्डची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यानुसार 1. महिला, 2. महिला, 3. खुला असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही रणांगणाबाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे याआधी प्रतिस्पर्ध्याविरोधात दंड थोपटणारे कोणती व्यूहरचना आखून आपली सरशी सिद्ध करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.