नांदेड : शिंदे गटाचे शिवसेनेचे नांदेडचे दोन जिल्हाप्रमुख शेकडो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर शिंदेगटात प्रवेश होणार आहे. साधारणतः तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झालेत तर काही जण रेल्वेनं मुंबईला जात आहेत. एक प्रकारे नांदेडच्या (Nanded) शिंदे गटाचे आज मुंबईत शक्तीप्रदर्शनच असणार आहे. आगामी काळात राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी हे शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलल्या जातंय. आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे वेळ दिल्याचे दोन्ही जिल्हाप्रमुखांनी सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड दौरा केला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा घाई गडबडीत आटोपला होता. त्या दौऱ्यात अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज मुंबईत भेट घेणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील तीन जिल्हाप्रमुखांपैकी दोन जिल्हाप्रमुख शिंदे गटासोबत गेले आहेत. तर जिल्ह्यातील एक आमदार आणि हिंगोलीचे खासदार देखील शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे असंख्य पदाधिकारी देखील आता शिंदे गटासोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. याचप्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांचे समर्थन करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे नांदेडच्या शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे.
तीनशे शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी मुंबईकडे रवाना झालेत तर काही जण रेल्वेनं मुंबईला जात आहेत. एक प्रकारे नांदेडच्या शिंदे गटाचे आज मुंबईत शक्तीप्रदर्शनच असणार आहे. आगामी काळात राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी हे शक्तीप्रदर्शन असल्याचे बोलल्या जातंय. आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीचे वेळ दिल्याचे दोन्ही जिल्हाप्रमुखांनी सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड दौरा केला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा घाई गडबडीत आटोपला होता. त्या दौऱ्यात अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज मुंबईत भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड दौरा केला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा घाई गडबडीत आटोपला होता. त्या दौऱ्यात अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज मुंबईत भेट घेणार असल्याचे सेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंद पाटील यांनी स्पष्ट केलंय.