बारामती : बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनरागमन (Baramati Ajit pawar Poster) केलं. यामुळे पवार कुटुंबियांसह राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत (Baramati Ajit pawar Poster) आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली (Baramati Ajit pawar Poster) आहे.
“दादा, आपण राज्यात प्रथम क्रमांकाने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आपण थांबू शकत नाही.”
“आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय, समस्त बारामतीकर” अशा आशयाचे काही बॅनर बारामतीमध्ये लावल्याचे दिसत (Baramati Ajit pawar Poster) आहेत.
अजित पवार यांनी सत्तेत सहभागी व्हावं अशी इच्छाही बारामतीकरांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहरासह अनेक ठिकाणी अशाप्रकारचे पोस्टर लावले (Baramati Ajit pawar Poster) आहेत.
अजित पवारांचे पुनरागमन
अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार (Baramati Ajit pawar Poster) पडली.
अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुळेंनी दिली होती.
ठाकरेंचा ग्रँड शपथविधी
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार निश्चित झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत.
मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.
शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारलं जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.