उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव (Dharashiv) नामांतरण विरोधबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी मसुद शेख व इतर 16 जणांनी याचिका दाखल केली. 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या याचिकेवर सुनावणी होणार असून ऍड सतीश तळेकर मार्फत याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद नामांतरण विरोधात मसुद ईस्माईल शेख,कादरखान, नगरसेवक खलिफा कुरेशी,आयाज हारून शेख,जफर अली मोमिन,असद खान पठाण, ईस्माईल बाबा शेख, वाजिद पठाण निजामोद्दीन[बाबा] मुजावर, बिलाल तांबोळी, मन्नान काझी आतिक शेख, समियोद्दीन मशायख, अफरोज पिरजादे, ईम्तियाज बागवान व ईलियास पिरजादे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरण विरोधबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी मसुद शेख व इतर 16 जणांनी याचिका दाखल केली. 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या याचिकेवर सुनावणी होणार असून ऍड सतीश तळेकर मार्फत याचिका दाखल केली आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी नामांतरणला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद येथे बैठक घेऊन विरोध दर्शविला आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी उस्मानाबादचे धाराशिव नामातरण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ठाकरे महाविकास आघाडी सरकारने नामांतरण निर्णय घेतला. मात्र सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेतल्याने कायदेशीर पेचप्रसंग नको म्हणून तो पुन्हा घेण्यात आला.
काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली होती.उस्मानाबादचे धाराशिव नामांतरण निर्णय घेतल्यानंतर उस्मानाबाद येथील नाराज झालेल्या काँग्रेसचे खालील सय्यद, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मसुद शेख यांच्यासह 50 पदाधिकारी यांनी पक्षाचे राजीनामे दिले तर मुस्लिम समाजाने एकत्र येत निवेदन दिले. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी नामांतरणला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद येथे बैठक घेऊन विरोध दर्शविला आहे.