Maharashtra political crisis : महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, पुण्यातील या नेत्याला विश्वास

| Updated on: Jul 04, 2023 | 9:01 AM

Breaking Political News : दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला, त्यानंतर महाराष्ट्रात भाजप पक्षावरती इतर पक्षातील सगळे नेते सडकून टीका करीत आहेत. पुण्यातील आपच्या नेत्यांनी सुध्दा भाजपच्या राजकारणावरती सडकून टीका केली आहे.

Maharashtra political crisis : महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, पुण्यातील या नेत्याला विश्वास
aap leader prakash kumbhar pune
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : रविवारी दुपारी महाराष्ट्रात (Maharashtra political crisis) पुन्हा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अजित पवार (leader ajit pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी सुध्दा मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपच्या चुकीच्या राजकारणावरती अनेक नेत्यांनी टीका केली आहे. काल शरद पवारांनी (NCP Leader Sharad Pawar) कराड आणि सातारा या दोन ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना (today latest political news) आश्वासन दिलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी फोडला, त्यांना सोडणार नसल्याचं सुध्दा जाहीर केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवार, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख इत्यादी नेते होते.

राष्ट्रवादी सोडून गेलेले काही नेते पुन्हा आमच्या संपर्कात असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा अनेक परत येतील असा विश्वास सुध्दा व्यक्त केला होता. काल अनेक आमदारांनी पुन्हा राष्ट्रवादीसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

देशातल्या इतर नेत्यांनी सुध्दा भाजप चुकीच्या पद्धतीने राजकारण करीत असल्याचा मोठा आरोप केला आहे. देशात भाजपने अनेक राज्यात अशा पद्धतीने राजकारण केलं असल्याचं सुध्दा म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

“भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे. असा आम आदमी पक्षाने आरोप केला आहे. आमदार आणि खासदारांच्या बाबतीत भाजप पक्ष षडयंत्र करून, पैसा देऊन, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आज महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचाऱ्याना आपल्या पार्टीत घेत आहे” असा आरोप पुण्यातील आपचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

“शिंदे, राणे, अजित पवार अशा मोठ्या नेत्यांना भाजपने गळाला लावलं आहे. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थीत हाताळत आहेत. भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देशात अस्थिरता निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.”

विशेष म्हणजे “महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीचं आणू शकते. समृद्धी मार्गावरील झालेल्या अपघातातील मृतांचा अग्नी शांत होत नाही, तोवर सत्तेचा खेळ सुरू केला, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी भाजपवर केला आहे.