मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govenrment) भलेही कोसळलं असेल. पण या सरकारने अखेरच्या दोन दिवसात तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निधी मंजुर केलाय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत आदेश घेतलाय. खरंतर एकनाथ शिंदेंसह (Rebel Shiv sena mla Shinde Group) सर्व बंडखोर आमदारांनी आपल्या बंडखोरीच्या कारणांपैकी एक प्रमुख कारणं हे निधी मिळत नाही, हे दिलं. मात्र महाविकास आघाडी सरकारनं एकट्या पुणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी 1 हजार 293 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. तर एकूण 1690 कोटी रुपयांच्या निधीलाही याच अखेरच्या दोन दिवसांत मंजुरी देण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याआधी गेला आठवडाभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर खरंतर हजारो कोटी रुपयांचे जीआर काढण्यात आल्याचीही माहिती समोर आलेली होती. तर गेल्या दोन दिवसांत चक्क दीड हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
अजित पवारांनी हा निधी नियमानुसार वाटप केल्याचा खुलासा केल्याचं वृत्तही दिव्य मराठी वृत्तपत्राने दिलं आहे. अजित पवार हे आपल्या प्रशासकीय कामांसाठी आणि धडाडीचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. अजित पवार यांना दोन दिवस आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते क्वारंटाईन झाले होते. अखेरच्या दोन दिवसात काढझण्यात आलेल्या शान निर्णयात अजित पवारांनी सर्वाधिक निधी हा पुण्यासाठी मंजुर केल्याची आकडेवारी आता समोर आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अखेरच्या दोन दिवसांत एकूण 112 शासना आदेश काढण्यात आले होते. या आदेशांच्या माध्यमातून विविध खात्यांच्या कामांसाठी 1 हजार 609 कोटी रुपयांच्या कामांना अजित पवारांनी मंजुरी दिली. यातली 1,293 कोटी रुपये हे एकट्या पुण्यासाठी खर्च केले जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 1293 कोटी रुपयांपैकी जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासासाठी 349 कोटी रुपये निधी खर्ड केला जाणार आहे. तर संभाजी महाराज समाथी स्थळ विकासासाठी 269 कोटी रुपये निधी खर्च केला जाईल. तर नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायची यांच्यासाठी 675 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.