मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) आमदार आपली भूमिका वेगळी असल्याचे सांगून एक गट तयार केला आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गट पक्ष आमचा असल्याचे सांगत कोर्टात (Court) गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. कारण पूर्वी 1 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. आत्ता 3 ऑगस्टला होणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर केले आहे. 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणी अद्याप सुनावणी बाकी असून त्याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूकडील मोठ्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
जेव्हापासून दोन गट विभक्त झाले आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रात एक वेगळं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही गटाने पक्षाचं आणि पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. दोन्ही गटानी आपली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ आणि कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं पक्षाचं आणि पक्षाचा झेंडा कुणाच्या पारड्यात जाणार याकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोगाच्या नोटीशीनंतर शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली होती.
सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे. तसेच सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात सध्या तारिख वाढल्याने आता महाराष्ट्र तीन तारखेची वाट पाहत आहे.