बीडः शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra Melava) कोण घेणार, ही शिंदे-ठाकरेंमधली लढाई कोर्टात लढली गेली. उद्या मैदानावर शब्दांच्या बाणांनी लढली जाणार. पण भगवान भक्ती गडावरचा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचाही आवाज यंदा महाराष्ट्राच्या सीमापार जाणार, अशी तयारी सुरु आहे. पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्याची महती सांगणारी एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा माहितीपट हिंदीत बनवण्यात आलाय. त्यामुळे पंकजांचा आवाज महाराष्ट्राबाहेरही घुमणार असे संकेत मिळतायत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेनेत उभी फूट पडली असल्याने यंदा शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.
तर कोर्टातल्या लढाईत जिंकल्याचा आनंद साजरा करत उद्धव ठाकरे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात सहभागी होतोय. एक नेता, एक झेंडा, एक मैदान… म्हणत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं शिक्कामोर्तब झालंय.
मागील आठवड्यात शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या लढाईनं महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. पण याच वेळी बीडमधील भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यातही काही संघटनांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली अनेक दशकांची परंपरा खंडीत होते की काय, अशी चिन्ह होती. मात्र अडचणी आता दूर झाल्या आहेत.
हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. शिवसेना आणि शिंदे गटानं जसे दसरा मेळाव्याचे टिझर लाँच केलेत. तसाच टिझर पंकजा मुंडे यांनीही लाँच केलाय.
आपला दसरा आपली परंपरा !!#AaplaDasraAapliParamparahttps://t.co/CwbNDOBIDb pic.twitter.com/xgOl6hJBjz
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 3, 2022
कोणताही बडेजाव न करता अगदी साधेपणाने, स्वतः पंकजा मुंडे यांच्याच आवाजात भगवान बाबांच्या भक्तांना आर्त साद घातली गेलीय. पंकजांचा हा टिझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मराठवाड्यातून हजारो लोक उद्या भगवान भक्तीगडाकडे चालत येतील…
याच धामधुमीत पंकजांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर घुमण्याचेही संकेत आहेत. कारण जिओ कंपनीतर्फे भगवान गडावरील दसरा मेळाव्यावर हिंदीत डॉक्युमेंट्री करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे सक्रीय नसल्या तरी राष्ट्रीय पातळीवर त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत.
https://t.co/CN6UKMBeKP या link वर पहा … I jiyo Media ने मला भेट केलेली एक डॉक्युमेंट्री “प्रचंड” …
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 2, 2022