मुंबई : राज्यसभेच्या (Maharashtra Rajya Sabha Election) चुरशीच्या जागेवर भाजपने रंगतदार विजय मिळवलाय. राज्यसभेची सहावी जागा जिंकत भाजपने तीन जागा आपल्या नावावर केल्या. सहाव्या जागी कोल्हापूरच्या धनंजय महाडिक हे विजयी झाले. त्यांनी संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. यामुळे पराभवाचा दुष्काळ संपल्याची भावना कोल्हापुरातील महाडिक (Dhananjay Mahadik) समर्थकांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान, निकाल लागल्यानंतर धनंजय महाडिक यांनी या विजयाचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलंय. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यामागे शिल्पकार जर कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहे, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलंय.
Many congratulations to Hon Union Minister @PiyushGoyal ji, @DoctorAnilBonde ji & @dbmahadik for grand victory in #RajyaSabhaElections2022 from #Maharashtra under the leadership of our leader Hon PM @narendramodi ji. pic.twitter.com/htmuywaSfs
हे सुद्धा वाचा— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 11, 2022
धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना, आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटलंय, की…
हा विजय यामध्ये भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांच्या कष्टामुळे यांच्या रणनितीमुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. कोणतीही निवडणूक असली की टेन्शन हे असतच.
ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील कारण फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माझं नाव घोषित केलं, जे गणित आखलं, जी रणनिती आखली, त्यामुळं आम्ही या निवडणुकीत यश संपादिक करु शकतो, याचा मला आनंद मिळतो.
या निवडणुकीत मला आपल्याला सांगायचा खूप अभिमान वाटतो, की माझा फक्त मुलगाच नाही, तर माझे सगळे भाऊ, माझी मुलं, माझी पत्नी, मित्र, मोठा परिवार, मुंबईत ठाण मांडून आहेत. महाडिक परिवाराचं बॉन्डिंय अख्ख्या महाराष्ट्रानं यावेळी पाहिलं.
आमच्या विजयाचे शिल्पकार जर कुणी असतील, तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यासोबत भाजपच्या सगळ्या नेत्यांची मेहनत आहे. ही निवडणूक अवघड आणि कठीण आहे. आमच्यासाठी ही निवडणूक खूप मोठी आहे. ही लढाईन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होती. भाजपनं ती जिंकली आहे. मी 2014 ते 2019 लोकसभेत काम केलंय. मला त्यासाठी पुरस्कारही मिळालेलंय. आता महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जोमाने काम करु.
ही निवडणूक लढवायची म्हणून नाही, तर जिंकायचीच म्हणून लढवली होती..!
मा. देवेंद्र फडणवीसमाझ्यावर विश्वास दाखवणारे माझे भाजपचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील विविध पक्षांचे आणि अपक्ष लोकप्रतिनिधी यांचा मी मनस्वी आभारी आहे. आपला विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेन. pic.twitter.com/GrYtmC50I3
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) June 11, 2022
राज्यसभेत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. शिवसेनेकडून कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्याविरोधात संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा परभव झाला. विशेष म्हणजे अटीतटीच्या लढतीत संजय पवार यांचा पराभव करत धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. त्यातही त्यांनी संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवून भाजपचा विजयी ध्वज राज्यसभेवर फडकवलाय.