Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : महाडिकांच्या विजयानं कोल्हापूरची समीकरणं बदलली, बंटी पाटलांसमोर तगडं आव्हान

| Updated on: Jun 11, 2022 | 9:46 PM

Maharashtra Rajya Sabha Election Results : महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमधील राज्यसभेता निकाल लागला. महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागी भाजपने विजय मिळवला आहे. चुरशीही ठरलेली सहावी जागाही भाजपने जिंकली. तर एक जागा शिवसेना, एक काँग्रेस आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : महाडिकांच्या विजयानं कोल्हापूरची समीकरणं बदलली, बंटी पाटलांसमोर तगडं आव्हान
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची लढत शेवटच्या क्षणी रंजक होत दिसली. राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन ज्येष्ठ आमदारांची मतदानाची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं नाट्यमय वळण लागलं. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी विशेष कोर्टात याचिका दाखल करून मतदान करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. गुरुवारी मतदान झालं. शुक्रवारी पहाटे निकाल लागला. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या राजकीय इव्हेंटचे राजकीय लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jun 2022 08:19 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

    – अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती.

    त्यांचं मॉनिटरिंग शिवसेना करत होती.

    – पाच सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही.

    कोणत्या अपक्ष आमदाराचे नाव घेणार नाही

    – आम्ही सर्व जणांनी पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले

    दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला.

    – आजही पहिल्या पसंतीची 163 मते आमच्याकडे आहेत

  • 11 Jun 2022 07:56 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांची पुण्यातून हाक

    संजय राऊत यांना सहाव्या पदावर यावा लागलं

    १०६ पैकी एक मत सुद्धा  बाद झालं नाही

    विधान परिषदेसाठी आमचा प्लॅन तयार आहे

    सप्टेंबर अखेरीस निवडणुका लागू शकतील

    ये तो एक झाकी है पुणे महापालिका बाकी है


  • 11 Jun 2022 07:56 PM (IST)

    भाजपचा जल्लोष सुरूच

    उद्या सकाळी 10 वाजता केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत मेडिकल कॉलेज पडवे येथे भाजपचा जल्लोष आयोजित केला आहे.नारायण राणे यावेळी माध्यमांशी ही संवाद साधतील.

  • 11 Jun 2022 07:54 PM (IST)

    छत्रपती संभाजीराजे 22 तारखेपासून राज्याचा दौरा करण्याची शक्यता

    मराठवाड्यातून होणार दौऱ्याला सुरुवात

    कोल्हापूरात उद्या ठरणार दौऱ्याचं नियोजन

    संभाजीराजे महाराष्ट्र पिंजून काढणार

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 11 Jun 2022 07:11 PM (IST)

    भाजपचे खासदार अनिल बोंडे घेणार आमदार मुक्ता टिळक यांची भेट

    काल आजारी असतानाही विधानभवनात येऊन केलं होतं मतदान

  • 11 Jun 2022 07:11 PM (IST)

    नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य

    राज्यसभा निवडणुकीत मला माझ्या एका छुप्या चाहत्यांनी जास्तीचे एक मतदान दिले

    प्रत्येक पक्ष हा डावपेच खेळत असतो हा राजकारणाचा भाग

    निवडणूक जिंकतात प्रफुल पटेल यांनी घेतले चांदपूरच्या देवस्थानाचे दर्शन

  • 11 Jun 2022 07:10 PM (IST)

    राज्यसभेच्या निकालानंतर पुणे भाजप जल्लोष

    – चंद्रकांत पाटील यांचे कोथरूडमध्ये जोरदार स्वागत,

    – कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चंद्रकांत पाटील यांचे जोरदार स्वागत,

  • 11 Jun 2022 07:10 PM (IST)

    सुजय विखेंचा खोचक टोला

    शिवसेनेच्या उमेदवाराचे गणित हे राष्ट्रवादीला धरून चालले होते. राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर मी तुम्हाला लिहून देतो निवडून आला असता

    शिवसेनेचा उमेदवार होता म्हणून राष्ट्रवादीने हात काढून घेतला निवडून आणण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही

    राष्ट्रवादी जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत शिवसेना पक्ष पूर्णपणे संपणार नाही

    विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शिवसेनेच्या आमदारांची नाराजी दिसून येईल

    मुख्यमंत्र्यांच सोज्वळ व्यक्तीमहत्व पण मला वाईट वाटतं ते चुकीच्या माणसांसोबत आहे

    शिवसेना राष्ट्रवादी सोबत राहिली तर आणखी धोका पाहायला मिळू शकतो

    अशीच स्थिती राहिली तर हे आमदार वीस-पंचवीस वर आल्याशिवाय राहणार नाही

  • 11 Jun 2022 07:09 PM (IST)

    तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद

    -जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवल जाणार आहे

    -पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूत येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार आहे

    -अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. केंद्रीय सुरक्षा पथकाने देहू संस्थांनला तशा सूचना दिल्यात. त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाण्याची शक्यता आहे.

  • 11 Jun 2022 04:19 PM (IST)

    संजय राऊत यांच्या आरोपानंतर स्वाभिमानीचे राजू शेट्टी आक्रमक

    संजय राऊत यांनी स्वाभिमानीच्या आमदाराने मत दिलं नाही असा आरोप केलाय

    देवेंद्र भुयार यांना आम्ही अगोदरच संघटनेतून काढून टाकलंय

    संजय राऊत यांनी स्वाभिमानीचं नाव घेऊन आमची बदनामी करू नये

    शेट्टींचा संजय राऊत यांना इशारा

    घोडेबाजार आणि दलबदलूच्या राजकारणात आमची बदनामी करू नका

  • 11 Jun 2022 04:18 PM (IST)

    विजयकुमार देशमुखांची मिश्किल टीका

    – सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंवर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची मिश्किल टीका

    – राज्यसभेला पहिले मतदान सोलापूरचे पालकमंत्री भरणेंनी केले त्यामुळे त्यांचा हातगुण चांगला म्हणून भाजपचे 3 खासदार निवडून आले

    – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप जिंकेल

    – कारण पाठीत खंजीर खूपसून हे सरकार आलेय त्यामुळे जनतेचा पाठिंबा भाजपला आहे

    – आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेत भाजप पुन्हा सत्तेत येईल

  • 11 Jun 2022 04:17 PM (IST)

    विधान परिषदेत सगळ्या 6 जागा निवडून आणण्यावर ठाम

    राज्यसभा निवडणुकीत सेनेचा ऊमेदवार हरल्यानंतर भाजप विधान परिषदेत सगळ्या 6 जागा निवडून आणण्यावर ठाम…

    – मविआ नेत्यांनी आपलं नामांकन परत घ्यावं यासाठी भाजप एक्शन मोडमध्ये…

    – प्रविण दरेकर , चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी… काही करून ऊमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांना निवडून आणावे हा पक्षाचा प्रतिष्ठेचा प्रश्न अशा फडणवीसांच्या नेत्यांना सूचना…

    विधानपरिषदेच्या जागेचं नामांकन परत घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी… सोमवारी नामांकन परत घेण्याची शेवटची तारीख…

    एकनाथ खडसे, सचिन अहीर आणि भाई जगताप यांचं भवितव्य अंधांतरीत असल्याची भाजपच्या पहिल्या फळीत चर्चा…

    – हे ३ नेते भाजपच्या रडारवर असल्याची सुत्रांची माहीती…

  • 11 Jun 2022 04:16 PM (IST)

    अब्दुल सत्तारांनी भाजपला मदत केली?

    अब्दुल सत्तार यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली; संतोष दानवे

  • 11 Jun 2022 03:31 PM (IST)

    भाजपचा राज्यभर जल्लोष

    राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात भाजपकडून जल्लोष करत केला आनंद साजरा

  • 11 Jun 2022 03:30 PM (IST)

    यवतमाळ- भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मोहम्मद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते

    त्यानंतर राज्यभरातील मुस्लिम समाज झाला होता आक्रमक

    नुपूर शर्मांविरोधात यवतमाळ मुस्लिम समाज ने तक्रार दिली असून त्यावर यवतमाळ शहर पोलिसात दाखल करण्यात आला

  • 11 Jun 2022 03:24 PM (IST)

    राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात भाजप कडून जल्लोष करत केला आनंद साजरा..

    राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात भाजप कडून जल्लोष करत केला आनंद साजरा..

    राज्यसभा निवडणूक विजयानंतर ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालय बाहेर ढोल ताशे वाजवत एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप आमदार संजय केळकर,निरंजन डावखरे सह भाजप पदाधिकारी देखील सामील होते.या विजयाचे खरे शिल्प कार हे देवेंद्र फडणवीस असल्याचे आमदार यांनी सांगितले आहे.6 व्या जागेचेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव करून भाजप चे तीन उमेदवार राज्य सभेवर गेले असून महाविकास आघाडीचे देखील 3 उमेदवार निवडून आले आहे मात्र कुठे तरी महाविकास आघाडी ला हा मोठा फटका बसला आहे .. राज्य सभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप ने शक्ती पणाला लावली होती. आता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भाजप महाविकास आघाडीला जागा दाखवणार असल्याचे भाजप कडून सांगण्यात आले आहे.

  • 11 Jun 2022 03:00 PM (IST)

    अब देवेंद्र अकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे – अमृता फडणवीस

    अब देवेंद्र अकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे – अमृता फडणवीस

    भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते
    हा सत्याचा विजय आहे
    सत्याच्या बाजूनं सर्व जण आहेत
    याचा आनंद आहे
    अब देवेंद्र एकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे
    भाजपकडे लोक जे आले ते प्रेमाने आलेत
    शिवसेना आता धडे मिळायला सुरवात होईल
    भाजप स्वतःच्या कर्तृत्वावर हा निकाल आहे
    भाजप काही महाविकास आघाडी नाही रडीचा डाव खेळायला

  • 11 Jun 2022 02:51 PM (IST)

    भावाच्या विजयानंतर महादेवराव महाडिक यांची प्रतिक्रिया

  • 11 Jun 2022 02:45 PM (IST)

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला संपवणार, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ही राष्ट्रवादीची खेळी; सुजय विखेंचा घणाघाती आरोप

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला संपवणार, शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ही राष्ट्रवादीची खेळी; सुजय विखेंचा घणाघाती आरोप

    राष्ट्रवादी काॅग्रेस शिवसेनेला संपवणार…
    गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न…
    भाजप खासदार सुजय विखेंचा घणाघाती आरोप…
    अपक्षांना दोष देण्यापेक्षा काॅग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे शिवसेनेने पहावं…
    राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय…
    काॅग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सुखी…
    मात्र सामान्य शिवसैनिकासह आमदार खासदार दुःखी आहेत…
    येणार्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार…
    मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र पहावं…
    राष्ट्रवादी काॅग्रेस पासून सावध रहाण्याची गरज…
    राष्ट्रवादी काॅग्रेस हा खेळ करणारा पक्ष …
    शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हि राष्ट्रवादीची खेळी…
    खासदार सुजय विखे पाटील यांचा घणाघाती आरोप..

    पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधले जातात…
    एव्हढ्या लांब जाण्यापेक्षा राष्ट्रवादीशी चर्चा करा…
    ते दिलखुलास पणे सांगतील त्यांनी हे का केलं…
    पवार साहेबांची निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रीया म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं…
    याचा विचार शिवसेनेने करणं गरजेचं…
    संजय राऊत यांच्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावामुळे विजय झाल्याच्या वक्तव्यावर सुजय विखे यांची टिका…

    महसूलमंत्र्यांच बदल्यात आणि वाळूच्या ठेक्यात गणित पक्क आहे…
    त्यांना वाटलं राज्यसभेचं गणितही तसंच आहे…
    त्यामुळे महसुलमंत्री कन्फ्यूज झाले…
    त्यांना आता निश्चित कळेल राजकारणाचं आणी बदल्यांचे गणित वेगळे असते…
    पुढच्या वीस तारखेला गणिताची ते सुधारणा करतील…
    सुजय विखे पाटील यांची महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टिका….

  • 11 Jun 2022 02:42 PM (IST)

    महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडूण यावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली – भुजबळ

    – महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडूनण्याआवे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली
    – दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव
    – मविआ ला अडचण अस काही नाही
    – मविआ ला बहुमत सिद्ध केलं।तेव्हा आम्हाला 170 आमदारांचा पाठिंबा होता
    – शेवटचा उमेदवार 39 मतांवर राहिला
    – एकूण जर बेरीज केली तर आमची वकुन संख्या 166 च्या वर
    – मविआ ही भक्कम आहे
    – ही निवडणूक प्रक्रिया किचकट
    – आमचा प्रयत्न होता, पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे
    – संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती
    – सरकार असताना आम्ही 170 ऐवजी 180 ची बेरीज करायला पाहिजे होती
    – त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत
    – पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे
    – तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली
    – मविआ चा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे
    – तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे
    – एकोप्याने पुढे जावं लागेल
    – विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप खेळ करू पाहते आहे
    – भाजपाने आधी 4 नंतर 6 उमेदवार सांगितले आहेत
    – आमचे 6 उमेदवार निवडणून येतील असे आम्हाला पहावं लागेल
    – पवारांनी कौतुक केलं म्हणण्या पेक्षा त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायला पाहिजे
    – लोकांना जवळ करण्यासाठी त्यांचे काम केले पाहिजे
    – मविआ च्या आमदारांना , जिल्ह्यातील पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन काम करावं
    – जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे
    – आम्ही एकमेकांच्या टांगेत टांग टाकता कामा नये
    – नाहीतर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात
    – तो पर्यंत कोणी बोलत नाही आम्हाला घाबरून
    – मुख्यमंत्री भेटत नाही असं मी म्हणणार नाही
    – त्यांचे ऑपरेशन झालं आहे
    – भेटतील आता
    – संजय राऊत यांनी नाव घेतले, ठीक आहे
    – आता त्यांना आपण पुढच्या कामासाठी जवळ कस करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे
    – संजय राऊत काठावर वाचले
    – आणखी उलट झालं असत
    – आमचं नशीब
    – नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते
    – आम्ही तर आमच्या लोकांना सगळं समजावून सांगितलं होतं
    – मात्र त्यातून या चुका कशा झाल्या, काय माहिती

  • 11 Jun 2022 02:13 PM (IST)

    निवडणुकीत विजयी उमेदवारांचे सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिनंदन

  • 11 Jun 2022 02:12 PM (IST)

    राज्य सभा निवडणुकीनंतर महादेवराव महाडिक यांची प्रतिक्रिया

  • 11 Jun 2022 02:11 PM (IST)

    सरकारला विनंती आहे वेश्या व्यवसायाला इतर व्यवसायाप्रमाणे मान्यता मिळाली पाहिजे – अमृता फडणवीस

    आज पहिल्यांदा बुधवार पेठेत आले याचा आनंद होतो

    आपला जो व्यवसाय आहे तो आजचा नाही, फार पुरातन आहे

    तुम्ही जो व्यवसाय करतात त्यामुळे समाजात बॅलन्स टिकून आहे

    तुम्ही जे काम करताय त्याचा तुम्हाला गर्व असला पाहिजे

    सुप्रीम कोर्टानेही तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतलाय

    स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या कुटुंब, समाज याकडे लक्ष द्यावे लागत

    सरकारला विनंती आहे वेश्या व्यवसायाला इतर व्यवसायाप्रमाणे मान्यता मिळाली पाहिजे

  • 11 Jun 2022 02:10 PM (IST)

    ‘भाजपच्या विजयानं मविआच्या तोंडचं पाणी पळालयं

  • 11 Jun 2022 02:08 PM (IST)

    मविआमुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान, फडणवीसांचं वक्तव्य

  • 11 Jun 2022 02:02 PM (IST)

    आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती आहे – फडणवीस

    आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती आहे

    त्यामुळं आता आपण बीजेपीसोबत गेलं पाहिजे

    त्यांच्यापेक्षा जास्त मतं आमच्या उमेदवाराला मिळाली पाहिजे

    निवडणूक सोप्पी नाही

    जे अंतर्गत कलह आम्ही पाहतोय

    काही झालंतरी माघार घेऊ नका

  • 11 Jun 2022 01:55 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

  • 11 Jun 2022 01:54 PM (IST)

    लक्ष्मण जगताप यांचं अभिनंदन, अत्यंत वाईट अवस्थेत पक्षाला गरज आहे म्हणून आले – फडणवीस

    तुम्ही थोडी महाराष्ट्र आहे

    यांनी तक्रार केली तर स्वागतार्ह

    संविधानाची शपथ घेतलेले मंत्री

    अजून त्यांच्या विभागाचे निर्णय त्यांचे फोटो लावून जाहीर करतात

    महाविकास आघाडीच्या पर्दाफाश झाला

    अंतविरोधाने भरलेलं सरकार आहे

    आता आमची अपेक्षा एव्हढी आहे की

    आमदारांमध्ये नाराजी आहे

    सरकार विवेक बुद्धीला स्मरून

    आज या निमित्ताने विश्वास

    लक्ष्मण जगताप यांचं अभिनंदन करतो

    अत्यंत वाईट अवस्थेत पक्षाला गरज आहे म्हणून मदत आले

    मुक्ताताई टिळक या सुध्दा मतदानासाठी आल्या

    त्या इथं एक दिवस आगोदर आल्या होत्या

    योग्य प्रकारे नियोजन केलं

    आता आम्ही समाधानी झालो असं नाही

    आठ वर्षात ज्या पद्धतीने चमत्कार घडवलाय

    त्याचपध्दतीने आम्ही प्रयत्न करू

  • 11 Jun 2022 01:43 PM (IST)

    एमआयएमची मतं नेमकी कुणाला गेली हे सांगता येत नाही – नाना पटोले

    नाना पटोले – बाईट

    – कालचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे

    – आमच्याकडे जास्त संख्याबळ १७२ मतं
    असताना आमचा उमेदवार पराभूत झाला

    – गेम प्लान मध्ये आम्ही अपयशी ठरलो.

    – ही निवडणुक हा माईंड गेम आहे

    – फडणवीस यांना शुभेच्छा

    – पवार साहेबांच्या मनात काय हे मला माहित नाही ( फडणवीस कौतुकावर)

    – या निवडणूकीत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या

    – MIM ची नेमकी मतं कुणाला गेली हे सांगता येत नाही

    – गेम प्लान मध्ये भाजप आघाडीवर, फडणवीसांना शुभेच्छा

    – आम्ही ४२ चा कोटा होता. त्यापेक्षा दोन मतं जास्त आली. ती कुठून आली माहित नाही

    – कोल्हापूर आम्ही जिंकलो तेव्हा शुभेच्छा मात्र दिली नव्हती

    – छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेत जावे ही आमची भुमिका होती

    – भाजप सत्तेचा दुरुपयोग लोकशाहीसाठी घातक

    – विधान परिषदन निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडूण येईल

    – भाजपला पैशाची गर्मी आहे. केंद्रीय यंत्राणांचा वापर होतोय.

    – गेम प्लानचा अर्थ त्यांनी सर्व गेम वापरले. यापासून आम्ही धडा घेतला

  • 11 Jun 2022 01:42 PM (IST)

    राज्यसभेत भाजपच्या विजयानंतर सांगलीत जल्लोष

    राज्यसभेत भाजपच्या विजयानंतर सांगलीत जल्लोष

    फटाक्यांची आतिषबाजी

    पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला

  • 11 Jun 2022 01:38 PM (IST)

    Devendra Fadnavis निवडणुकीत चांगले खेळाडू ठरले – उल्हास बापट

  • 11 Jun 2022 01:35 PM (IST)

    भाजपच्या विजयानंतर अनेक लोक बावचळले आहेत – फडणवीस

  • 11 Jun 2022 01:31 PM (IST)

    मात्र आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही दुसऱ्यासोबत संसार मांडला – फडणवीस

    आम्हाला शिवसेनेसोबत सत्ता दिली होती, मात्र आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही दुसऱ्यासोबत संसार मांडला. किमान आता ती सत्ता किमान नीट चालवून दाखवा. आज जे चाललंय, ते मोदींच्या प्रोजेक्टमुळे सगळं सुरु आहे. सगळं केंद्राच्या भरवशावर सुरु आहे. यांना सगळा जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही हे म्हणतात पैसा मिळाला नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करु कशे?

    ही छोटी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे, येत्या काळात. मनपा, पंचायत समिती, जि.प. सगळ्या स्तरावर यांना आपण परास्त करु. 2024 ला आपण सगळ्यांना पराभूत करु. उत्साह काम ठेवा, सुरुवात झाली. मुंबई मनपावर आपल्याला भाजपचा भगवा लावायाचाय, त्यासाठी तयार राहा.

  • 11 Jun 2022 01:30 PM (IST)

    आज शेतमाल खरेदीची अवस्था अतिशय वाईट आहे

    आज शेतमाल खरेदीची अवस्था अतिशय वाईट आहे, विजेचा तुडवडा, लोड शेडिंग अशा प्रकारे राज्य मागे चाललंय. तुम्ही जरी बेईमानीने राज्य घेतलं असलं, तरी तुम्ही राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड, नशिबाने माझं मुंबईत घर नाहीय, शासकीय घरच पाडावं लागेल, राणेसाहेब माझं नागपूरला घर आहे, आणि ते एकदम लीगल आहे, नाहीतर मलाही नोटीस आली असती.

  • 11 Jun 2022 01:28 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्र्यांनी आंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा विकास थांबलाय, केवळ आमच्याशी लढायचं म्हणून अनेक प्रकल्प थांबवलेत, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही.

  • 11 Jun 2022 01:27 PM (IST)

    त्यांना जर खरंच माहिती असेल की कुणामुळे जिंकलेत, हे जर त्यांना कळालं तर ते काही करणार नाही – देवेंद्र फडणवीस

    त्यांना जर खरंच माहिती असेल की कुणामुळे जिंकलेत, हे जर त्यांना कळालं तर ते काही करणार नाही. कारण यांना सरकार टीकवायचंय, त्यांच्या पाठबळावर ही सत्ता आहे, त्यांनी जर त्यांच्यावर कारवाई केली तर ते तर निघूनच जातील, पण ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही, पण मनाने आपल्यासोबत होते, तेही निघून जातील

  • 11 Jun 2022 01:26 PM (IST)

    अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काही लोकं बावचळते – फडणवीस

    अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काही लोकं बावचळते, आणि पिसाटलेत. आपण जिंकलोय, जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते, उद्माद करायचा नसतो, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करुया.

  • 11 Jun 2022 01:25 PM (IST)

    कोल्हापूरचै पैलवान धनंजय महाडिक आहेत, फडणवीस

    संजय राऊतांपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आले ते कोल्हापूरचै पैलवान धनंजय महाडिक, हा विजय आहे, तो आपले लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे, शारीरीक परिस्थिती नसतानाही त्यांनी मतदान केलं, त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा नीट निवडून आली, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.

  • 11 Jun 2022 01:18 PM (IST)

    महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात आहे – चंद्रकांत पाटील

    हा बुद्धीचा चमत्कार आहे

    राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले आहेत

    अनिल बोंडे यांचा सत्कार करण्यात आला

    धनंजय महाडीक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

    देवेंद्रजी लोकांना संभाळतात,

    त्याचं लक्ष दुसरीकडं होतं

    त्यांनी शिकून घ्यावं

    महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात आहे – चंद्रकांत पाटील

    देवेंद्रजी खूप प्रेमळ आहेत

    ज्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांना सुद्धा माहित नसतं

    देवेंद्र फडणवीसांनी एक विश्वास तयार केला आहे

  • 11 Jun 2022 01:10 PM (IST)

    भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • 11 Jun 2022 01:03 PM (IST)

    विधानपरिषदेच्या सगळ्या जागा भाजप जिंकेल – राधाकृष्ण विखे पाटील

    विजयाचं सगळं श्रेय फडणवीसांना जात

    पाया भरणी झाली आहे

    विधानपरिषदेच्या सगळ्या जागा भाजप जिंकेल – राधाकृष्ण विखे पाटील

    भाजपच्या स्टेजला जल्लोष असं नाव दिलं आहे

    प्रवीण दरेकर सुद्धा कार्यक्रमाला हजर आहेत

    या कार्यक्रमाला जल्लोष असं नाव देण्यातं आलं आहे

     

  • 11 Jun 2022 01:01 PM (IST)

    भाजपा कधी हारणार नाही

    भाजपा कधी हारणार नाही

    ही सगळ्यांची जीत आहे

    चंद्रकांत पाटील सुध्दा जल्लोषात हजर झाले आहेत

     

  • 11 Jun 2022 01:00 PM (IST)

    मुंबईत भाजपचा जल्लोष, फडणवीसांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    मुंबईत भाजपचा जल्लोष, फडणवीसांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    फडणवीसांची कार्यक्रमाला उपस्थिती

    राज्यसभेच्या निवडणुकीचा जल्लोष

    मोठे नेते जल्लोषात सामील होण्याची शक्यता

  • 11 Jun 2022 12:47 PM (IST)

    राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या घोडेबाजार’अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

  • 11 Jun 2022 12:46 PM (IST)

    राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप

  • 11 Jun 2022 12:46 PM (IST)

    सुप्रिया सुळें कडून भाजपच कौतुक

  • 11 Jun 2022 12:40 PM (IST)

    ये तो झाकी है पिक्चर अभि बाकी है, नवनीत राणांनी केलं फडणवीसांचं कौतुक

    संजय राऊत यांना सगळ्यात शेवटच्या आवडीची मत भेटले आहे.

    त्यांनी त्याच्यावर लक्ष दिले पाहिजे शिवसेनेतही त्यांना त्यांची लोक पसंत करत नाही.

    आमदारांना संजय राऊत आवडत नाही.

    ये तो झाकी है पिक्चर अभि बाकी है.

    अभिनंदन तर देवेंद्र फडणवीस यांचे आहे

    त्यांनी त्यांच्या काळात सर्व लोकांना सांभाळून घेतलं

    मतदान गुप्त असते तर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं असते…..

    देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराला वेळ दिली आमदारांच्या मतदारसंघात कामे टाकली.

    काही जण सांगत होते सहावी सिट येणार नाही त्यांनी या पक्षांची मिटिंग घेतली हॉटेलमध्ये राहायचा खर्च केला

    रवी राणा यांनी आधीच सांगितलं होतं अपक्ष भाजपासोबत आहे.

  • 11 Jun 2022 12:38 PM (IST)

    निवडणूक आयोगाने समोरच्यांची मते बाद केली नाही – संजय राऊत

    ज्या कारणासाठी माझं एक मत बाद केलं. अशाच प्रकारचा काही मतांवर आक्षेप आम्ही ही घेतला होता. त्याचप्रकारची चूक समोरच्यांनी केली. पण त्यांची मते बाद झाली नाही. निवडणूक आयोगाने समोरच्यांची मते बाद केली नाही. त्यात सात तास गेले. मत शोधण्यासाठी. कुणाला पडणारं मत बाद झालं. केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा काम करतात हे आम्ही डोळ्यांनी पाहतो. कुठे ईडी वापरलं जातं, कुठे सीबीआय वापरलं जातं. कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का हा प्रश्न आहे

  • 11 Jun 2022 12:32 PM (IST)

    ‘भाजपने दिलेल्या संधीच आम्ही सोन करु’ धनंजय महाडिकांच वक्तव्य

  • 11 Jun 2022 12:31 PM (IST)

    हा भाजपचा रडीचा डाव आहे, निवडून आयोगाकडून जे झालं तो बालिशपणा वाटतो – सुप्रिया सुळे

    सुप्रिया सुळे

    भाजपने हा रडीचा डाव खेळला

    शरद पवार यावर सगळं बोललेच आहेत

    आम्ही ड्रामा करत नाही, आम्ही खूप सिरियस काम करतो

    महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केलं

    महाविकास आघाडी एक दोन दिवसात बैठक घेईल

    त्यानंतर स्पष्ट होईल, कुठं काय कमी पडल

    आम्ही रोज रिक्स घेतो

    ज्या घरात माझा जन्म झाला तिथं मी जेवढ यश बघितलं तेवढंच अपयश बघितलं आहे

    निवडून आयोगाकडून जे झालं तो बालिशपणा वाटतो

    दबाब सगळ्यांवरच आहे

    ही निवडणूक आहे, यात काही खात्री आहे का

    नबाब मलिक आणि अनिल देशमुख यांना डांबून ठेवलं, ते दोषी नसतात

    हा भाजपचा रडीचा डाव आहे

  • 11 Jun 2022 12:29 PM (IST)

    नाशिकमध्ये भाजप कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

    नाशिक – भाजप कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष..

    राज्यसभा निवडणुकीतील यशा नंतर जल्लोष साजरा

    घोषणा देत, टाके फोडत केला जल्लोष

  • 11 Jun 2022 12:26 PM (IST)

    शिवभोजन योजनेचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले कौतुक

    शिवभोजन योजनेचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले कौतुक

    शेतकरी विद्यार्थी कामगार महिला यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत

    महाविकास आघाडी सरकार विषयी लोकात आपुलकी राहिली नाही

  • 11 Jun 2022 12:26 PM (IST)

    बाळा नांदगावकर यांची आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा

    आगामी महानगरपालिका व इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार

    मनसे आपली लढाई स्वबळावर लढाई लढणार आणि निवडून येणारं

    बाळा नांदगावकर यांची आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा

    आम्ही आधीही एकला चालोरे होते, आज ही एकला चलो रे आहोत

    कार्यकर्ताना स्वबळावर निवडणुका लढवाव्या असे स्पष्ट आदेश दिले आहेत

  • 11 Jun 2022 12:25 PM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, बाळा नांदगावकरांची संजय राऊतांवर टीका

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा

    अजूनही वेळ गेलेली नाही, आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये

    मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सहकुटुंब घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन, ठाकरे यांना सल्ला तर संजय राऊत यांचे नाव न घेता टिका

    बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्वी सर्व घडत होते मात्र आता ते दिवस राहिले नाहीत, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात

    सेना मनसे युती हा विषय आता इतिहास जमा

    काही लोक स्वतः ला पक्ष प्रमुख समजूज पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे

    राज्यसभेच्या पराभवानंतर नांदगावकर यांनी लगावला शिवसेनेला टोला

    राज्यसभेच्या निकलापासून शिवसेना आत्मचिंत न करून धडा घेईल ही अपेक्षा व विधान परिषदेत योग्य ते घडेल

  • 11 Jun 2022 12:22 PM (IST)

    जयंत पाटलांची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया

  • 11 Jun 2022 12:20 PM (IST)

    भाजपाच्या घोषणाबाजीतून मविआ सरकारला डिवचण्याचा प्रयत्न

  • 11 Jun 2022 12:18 PM (IST)

    Sanjay Raut यांनी जाहीर केली फुटलेल्या अपक्ष आमदारांची नावं

  • 11 Jun 2022 12:17 PM (IST)

    नाचता येईना अंगण वाकडे, अशी शिवसेना आणि संजय राऊतांची अवस्था

  • 11 Jun 2022 12:17 PM (IST)

    |राऊतांच्या बोलण्यात तथ्य, आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केलं संजय राऊतांचं समर्थन

  • 11 Jun 2022 12:14 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुहास कांदे जाणार कोर्टात

  • 11 Jun 2022 12:09 PM (IST)

    भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणार – धनंजय महाडिक

    आत्ता हा त्यांचा भाग आहे

    सत्ताधारी पक्षामध्ये समर्थन दिलं आहे

    यातून त्याची खदखद जाणवत होती

    त्यांचा प्रत्यय काल आपल्याला दिसून आला

    गेले दोन तीन दिवस

    भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणार

    पंधरा दिवसात घेतलेल्या मेहनतीला यश आलं आहे

    त्याचाच प्रत्ययं या कुटुंबात आला आहे

  • 11 Jun 2022 12:03 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस कसले काम करतात, हेही त्यांनी दाखवून दिले आहे – दरेकर

    शरद पवार आणि त्यांच्या बाजूचा फटका बसला आहे, देवेंद्र फडणवीस कसले काम करतात, हेही त्यांनी दाखवून दिले आहे,

    राजकारणात जय-पराजय असतो, विजयात देवेंद्र फडणवीस यांचे चाणक्य धोरण असते.

  • 11 Jun 2022 12:01 PM (IST)

    गर्वाचे घर नेहमीच खाली राहते!

  • 11 Jun 2022 12:00 PM (IST)

    प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद

  • 11 Jun 2022 11:57 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या आमदारांनी आम्हाला मतदान केलं – प्रफुल्ल पटेल

    महविकास आघाडी मध्ये मत मिळाले नाही अस झाल नाही, आमच्या आमदारांनी मत बरोबर दिलीत.

    अपक्ष आणि लहान पक्षांनी आवरजून माहविकास आघाडीला मतदान केलं आहे..

    ४,५ अपेक्षित मत मिळाली नाही.

    आमची दोन मत देशमुख आणि मलिक मत मिळाले नाही.एक अपात्र ठरलं

    काही अपक्षांची क्षणिक नाराजी असू शकते..

    मला ४३ मत मिळाली एक कुठून मिळाल याच संशोधन करावं लागेल..

    आमच्या मंत्र्यांची मत आम्ही संजय पवारांना दिली..

    मोठा प्रलय आला सगळे लोक आम्हाला सोडून गेले अशी स्थिती नाही, मात्र काय झालं त्याच विश्लेषण करावा लागेल..

    राष्ट्रवादी चे ५१ मत आम्ही व्यवस्थित काम केलं त्यात काहीही कमी जास्त झालं नाही..

    काँग्रेसने काय केले हे माहिती नहीं,

    विधान परिषद मतदानाची प्रक्रिया वेगळी आहे, त्यात गुप्त पद्धतीने मतदान करता येईल.

    १,२ दिवसात आम्ही अभ्यास करून तयारी करू.

    ऑन संजय राऊत –
    आरोप प्रत्यारोप करण मला आवडत नाही मी करणार नाही

    ऑन लोकसभा –
    जनतेची इच्छा असेल तर मी पुन्हा एकदा लोकसभेत जाऊ शकतो..

    ऑन नाराजी –
    एका पक्षाच्या सरकार मध्ये सुद्धा थोडी फार नाराजी असते हे तीन पक्षाचे सरकार आहे

    माझ्या प्रेमा पोटी मला एक मत जास्तीतच मिळालं ते कोणाचा प्रेम आहे माहीत नाही पण माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत , प्रेमा पोटी मी आणखी चार पाच मत मिळवू शकलो असतो

    मला खूप समाधान आहे मी सगळ्यांचे आभार मानतो

  • 11 Jun 2022 11:55 AM (IST)

    विजयानंतर प्रवीण दरेकर धावत आले, पाटलांना मिठ्ठी मारली

  • 11 Jun 2022 11:53 AM (IST)

    संजय पवार माझ्या घरातील व्यक्ती, पराभव झाल्याने दु:ख झालं – चंद्रकांत पाटील

  • 11 Jun 2022 11:52 AM (IST)

    मविआ मतं बाद झाली अशी रडारड सुरू करेल, अतुल भातखळकर यांनी डिवचलं

  • 11 Jun 2022 11:47 AM (IST)

    पाहा काय म्हणाले संजय राऊत

  • 11 Jun 2022 11:45 AM (IST)

    नाचता येईना आंगण वाकड – चंद्रकांत पाटील

    नाचता येईना आंगण वाकड – चंद्रकांत पाटील

    एका महिलेला किती त्रास दिला

    सत्तेचा दुरूपयोग करत आहेत

    यांनी कायदा बदलला

    निवडणूक आयोग आमचे दोन आक्षेप फेटाळले

    संजय पवार हे माझ्या घरातलं मुलगा आहे

    त्यामुळं दु:ख झालं

    त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण येत नाही

    हे दाखवायचं नाही

  • 11 Jun 2022 11:40 AM (IST)

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साई दरबारी, सहकुटुंब घेतले साई समाधीचे दर्शन

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साई दरबारी…
    सहकुटुंब घेतले साई समाधीचे दर्शन…
    साई संस्थानच्या वतीने मिलिंद नार्वेकरांचा सपत्नीक सत्कार…
    राजकीय विषयावर बोलण्याचे मात्र प्रकर्षाने टाळले…
    शिर्डी नंतर शनिशिंगणपुरातही घेणार शनी देवाचे दर्शन…

  • 11 Jun 2022 11:39 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा अचानक रद्द

    नाशिक – आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा अचानक रद्द

    नाशिकच्या वणी गडावर आज येणार होते आदित्य ठाकरे

    नळ-पाणी योजना आणि इतर कामांचा होणार होता उद्घाटन सोहळा

    मात्र दौरा अचानक रद्द

    गुलाबराव पाटील मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणा

  • 11 Jun 2022 11:38 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय खेळीवर अपक्ष आमदार जोरगेवार फिदा; म्हणाले , “गणित शास्त्राचा योग्य अभ्यास भाजपाने केला”

    अँकर:– चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवारांनी घोडेबाजार शब्दावर नाराजी व्यक्त करीत वेगळा विचार करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला होता.जोरगेवारांची नाराजी दुर करण्यासाठी चंद्रपूरचा दौऱ्यात आलेल्या खासदार सूप्रीया सूळे यांनी जोरगेवारांची भेट घेतली होती. राज्यसभेचा सहा जागांचा निकाल लागला.यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी खेळलेली राजकीय खेळीची चर्चा राज्यात रंगली आहे.अश्यात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी देवेंद्र फडणविस यांचा खेळीवर स्तूतीसूमणे उधळली आहेत.
  • 11 Jun 2022 11:35 AM (IST)

    मी घोडेबाजारातलं आहे की नाही हे सगळ्यांना माहित आहे – संजय मामा शिंदे

    संजय मामा शिंदे

    पराभव झाल्यानंतर हे होणार

    मी घोडेबाजारातलं आहे की नाही हे सगळ्यांना माहित आहे

    उद्धव ठाकरेंना भेटून ही गोष्ट सांगणार आहे

    ज्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे

    मी हरभरे खाणाऱ्यातला आहे, स्वाभिमानी आहे का ?

    विश्वास नव्हता तर माझं मत बघायचं होत.

  • 11 Jun 2022 11:30 AM (IST)

    राज्यसभेचा निकाल बघून धक्का बसला.संजय राऊत यांच्या शब्दात तथ्थ आहे – नरेंद्र भोंडेकर

    राज्यसभेचा निकाल बघून धक्का बसला.संजय राऊत यांच्या शब्दात तथ्थ आहे.

    या संदर्भात वरीष्ठ नेते चौकशी करणार

    शिवसेना समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा संजय राऊत चा वक्तव्याचे समर्थन.

  • 11 Jun 2022 11:29 AM (IST)

    घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलं नाही

    घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलं नाही

    आमचे चे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही

    कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत

    आम्ही व्यापार केला नाही

    यांना पहाटेची सवय आहे यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत

    मी माझ्या पक्षाने दिलेल्या 42 मतांवर लढत होतो त्यातलं एक मत माझं बात केलं

    घोडे बाजारात या घोड्यांमुळे कुठल्याही सरकारला धोका होत नाही घोडे जिथे असतील तिथे देखील असतील जिथे हरभरे टाकतील तिथे जातात

    ते महाराज आहे छत्रपती आहेत त्यांच्याविषयी काय बोलायचं

    नक्कीच ते धाडस होतं आमचा हा आकडा होता समोरच्याने ताकद व केंद्रीय तपास यंत्रणांचा ताकद वापरून घोडेबाजार केला महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासला त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद ठाकरे सरकार देखील करतात

    गेली अडीच वर्ष आम्ही काऊंटडाऊन ऐकतच आहोत

    जनतेच्या न्यायालयात आहोत

    हा घोडेबाजाराचा मेंडेट असतो

    काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला

    संजय पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पराभवामुळे मुख्यमंत्री देखील व्यतीत झाले आहेत अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्षश्रेष्ठी ठेवत असतो

    वसईचे हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाही

    देवेंद्र भुयार यांची मदत देखील आम्हाला मिळाली नाहीत

    तुम्ही दुसऱ्याची फळ चाखत बसलेले आहेत तुम्ही त्यांना का उमेदवारी नाही दिली तुमचं राजेंवर इतकं प्रेम होतं तर धनंजय महाडिक यांच्या जागेवर त्यांना निवडून आणला पाहिजे होतं

    विधान परिषदेत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेस देखील एक उमेदवार निवडून येईल

  • 11 Jun 2022 11:27 AM (IST)

    अजित पवार आणि जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केले – प्रफुल्ल पटेल

    प्रफुल्ल पटेल लाईव्ह

    सगळ्यांनी मतदान केलं आहे

    महाविकास आघाडीच्या आमदारांनी मतदान केलं आहे

    चार पाच आमदारांनी मतदान केलेलं नाही

    अपक्षांची नाराजी आहे

    तिन्ही पक्षांनी व्यवस्थित मतदान केलं

    राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी संजय पवारांना मतदान केलं

    कॉंग्रेसने ४४ मतं घेतली

    कांदेचं एक मत अवैद्य ठरलं

    विश्लेषण नक्की होणार

    ज्यांनी मतदानाची आकडेवारी बसवली होती

    आम्ही काम केलं आहे

    अजित पवार आणि जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केले

    मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले

    सकाळी चारवाजेपर्यंत मतमोजणी सुरु होती.

    कुणी काय गडबड केली तर त्यांच्यावरती कारवाई करता येते

    आरोप प्रत्योरोप करणं

    दिवसा तारे बघायचे प्रकार आहेत

  • 11 Jun 2022 11:23 AM (IST)

    मी घोडेबाजारातलं आहे की नाही हे सगळ्यांना माहित आहे – संजय मामा शिंदे

    संजय मामा शिंदे

    पराभव झाल्यानंतर हे होणार

    मी घोडेबाजारातलं आहे की नाही हे सगळ्यांना माहित आहे

    उद्धव ठाकरेंना भेटून ही गोष्ट सांगणार आहे

    ज्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे

    मी हरभरे खाणाऱ्यातला आहे, स्वाभिमानी आहे का ?

    विश्वास नव्हता तर माझं मत बघायचं होत.

  • 11 Jun 2022 11:07 AM (IST)

    हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात, संजय राऊत यांची अपक्ष आमदारांवर टीका

    हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात, संजय राऊत यांची अपक्ष आमदारांवर टीका

    नक्की कोणाला पडणार मतं बाद झालं

    पुढं ईडी वापरलं जात

    पहिल्या फेरीची ३३ मतं मिळाली आहे

    त्यांना २७ मतं मिळाली आहेत

    जास्त बोली लागली लागल्याने घोडे विकले गेले

    ते कोणाचेचं नसते

    त्यांचं एकही मतं फुटलं

    काही अपवाद सोडले तर मतदान आम्हाला मिळाली

    आम्ही व्यापार केला नाही.

    सुहास कांदे यांचं मत बाद केलं

    त्याच पद्धतीने आम्ही सुधीर भाऊच्या आक्षेप घेतला

    आमचं मत बाद केलं

    पहाटेची उपक्रम करायची सवय आहे त्यांना

    मी फक्त दिलेलं ४२ मतांची लढत होती

    मी विजयी झालोय, त्यामुळे मी महाविकास आघाडीचा

    हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात,

    दिल्लीत ताकद वापरली

    घोडे बाजाराला उत्तेजन दिली

    घोडे बाजारात जे विकले त्यांची नोंद झाली आहे

    शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही

    त्याच्यावरती कोणतीही सुनवाई झालेली नाही

    काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली

    काही लोकं माझी इतर मतदान बाद करण्याच्या प्रयत्नात होते

    आम्हाला विरारचे ठाकूर यांची तीनं मतं मिळाली

    देवेंद्र भुयार

    तुम्ही का आंबे का चोखत बसला

    विधानपरिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार

    शिंदे, शिंदे, भुयार, ठाकूर, शिवसेनेच्या संजय पवारांचा गेम करणाऱ्या एका एका आमदाराचं नाव संजय राऊतांनी जगजाहीर घेतलं

  • 11 Jun 2022 10:52 AM (IST)

    राज्यसभा निवडणूकीच्या विजयानंतर काय म्हणाले प्रताप गडी ?

  • 11 Jun 2022 10:46 AM (IST)

    राज्यसभा निवडणूकीच्या निकालावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

  • 11 Jun 2022 10:40 AM (IST)

    राज्यसभेच्या निकालानंतर छत्रपती संभाजीराजेंनी प्रमुख मराठा समन्वयकांची बोलवली बैठक

    राज्यसभेच्या निकालानंतर छत्रपती संभाजीराजेंनी प्रमुख मराठा समन्वयकांची बोलवली बैठक

    छत्रपती संभाजीराजे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार

    स्वराज्य संघटना मजबूत करण्यासाठी करणार दौरा

    दौऱ्याच नियोजन करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

    बैठकीत ठरणार नियोजन कोल्हापूरात उद्या होणार बैठक

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 11 Jun 2022 10:33 AM (IST)

    महाविकास आघाडीला 2 ते 4 अपेक्षित मतं मिळाली नाही, प्रफुल पटेल यांचं वक्तव्य

  • 11 Jun 2022 10:29 AM (IST)

    पुण्यात आज भाजपचा जल्लोष, चंद्रकांत पाटलांचा भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार

    पुण्यात आज भाजपचा जल्लोष

    राज्यसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाचा करणार जल्लोष,

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जल्लोषात होणार सहभागी

    कोथरुडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करणार जल्लोष

    चंद्रकांत पाटलांचा भाजप कार्यकर्ते करणार सत्कार

    चंद्रकांत पाटील आज मुंबईतून पुण्याकडे जाणार !

    भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात साजरा केला जातोय जल्लोष

  • 11 Jun 2022 10:20 AM (IST)

    10 अपक्ष लोकांनी गडबड केली – गुलाब पाटील

    10 अपक्ष लोकांनी गडबड केली,
    त्यांच्या डोक्यात काय आहे ते चिंतन करावे लागेल
    विरोधक चालीत यशस्वी झाले,
    चिंतन , मनन करायची गरज आहे
    कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय
    लोकं सांभाळण्यात कमी पडलो,
    लोकं सांभाळलो असतो ते झाले नाही,
    शिवसेनेला फायद्याच होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल
    देवेंद्रजींची चाल यशस्वी ठरली,
    आत्ताच योग्य निर्णय घ्यावं लागेल

  • 11 Jun 2022 10:18 AM (IST)

    कोल्हापूरचे लोक प्रामाणिक, जनतेने माझ्या भावना खूप प्रेम दिले – धनंजय महाडिक

    कोल्हापूरचे लोक प्रामाणिक, जनतेने माझ्या भावना खूप प्रेम दिले

    राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केले नाही

    स्वतःचे धंदे सांभाळून कधी राजकारण केले नाही

    मी जे पेरले ते उगवून येत आहे, जनतेने दिले ते संपणार नाही

    जनतेने मला दीर्घायुष्य दिले आहे, जनतेने मला दिले, मी जनतेला देत राहीन

    त्या कामातूनच मी मोठा झालो आहे.

    ——–

    जिल्ह्यातील राजकारण दिशा बदलणार नाही

    चांगले राजकारण असते तेच टिकते

    स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही

    —–
    कोणी मला काय म्हणून अगर नाही म्हणो मी त्याचा विचार करत नाही

    चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो

    ——

    जिंकणं आणि हारणं यावरती महाडिक कुटूंबाचा संकट नाही

    ज्यावेळी देव संकट आणेल तेव्हाच ते माझ्यावर संकट असेल

    पृथ्वी गोल आहे, माणसाची निट्टीमत्ता चांगली असेल तर सर्व गोष्टी चांगल्या होतात

    या जिल्ह्याला लाख वेळा नमस्कार केला तर ऋण फिटणार नाही

    ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो

    महाडीकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही
    ——–
    मी कोणाला सल्ला देणार नाही, फुकट सल्ला देणार नाही

    जोपर्यंत माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत सल्ला देणार नाही

    राजकारणात ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने तो राजकारणात राहतो

    जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते

    माणसाने राजकारणात लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे

  • 11 Jun 2022 10:16 AM (IST)

    शिवसेनेचे सहावे उमेदवार संजय पवार पराभूत

  • 11 Jun 2022 10:10 AM (IST)

    केंद्रीय तपास यंत्रणेचा विजय झाला…

  • 11 Jun 2022 10:06 AM (IST)

    निकालानंतर शरद पवार काय म्हणाले पाहा

  • 11 Jun 2022 10:04 AM (IST)

    Rajya Sabha Election Result | BJP च्या एकाही मताला धक्का पोहचला नाही sharad pawar यांनी केले स्पष्ट

  • 11 Jun 2022 09:58 AM (IST)

    शरद पवार म्हणतात, मला धक्का बसला नाही

  • 11 Jun 2022 09:56 AM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स

  • 11 Jun 2022 09:50 AM (IST)

    फोडाफोडी आणि दबावाचं राजकारणही या निवडणुकीत दिसलं, हे लोकशाहीसाठी नक्कीच चिंताजनक – रोहित पवार

  • 11 Jun 2022 09:46 AM (IST)

    मनात नव्हता असा निकाल आला, भाजपचा गेम यशस्वी ठरला – गुलाबराब पाटील

    – मनात नव्हता असा निकाल आला
    – या निकाला मुळे आम्हाला विचार करावा लागणार
    – व्हीप असल्याने पक्षाच्या लोकांचं चुकलेल नाही
    – 10 लोकांनी गडबड केली
    – विरोधक त्यांच्या चाळीत यशस्वी
    – ते काय आपली आरती करणार नाही
    – त्यांचा गेम यशस्वी ठरला
    – शेवटी विश्वास ठेवावा लागतो
    – मविआ मध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता
    – पण हीच मदत आम्हला मिळाली असती तर विजय झाला असता
    – मी डब्बा, माझं इंजिन मुंबईत
    – नेत्यांच्या कानात सांगूंयात
    – शिवसेनेला फायदा होईल ते करणं गरजेचं
    – सिंहावलोकन करणं गरजेचं आहे
    – निकाला वरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे
    – 20 तारखे पर्यंत आओ मेरे घर म्हणावं लागेल

  • 11 Jun 2022 09:41 AM (IST)

    शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत – अमोल मिटकरी

    शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत. त्यामुळे भाजपा चा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार.

  • 11 Jun 2022 09:38 AM (IST)

    सुहास कांदेंचं मत बाद झाल्यानं राऊत काठावर पास

  • 11 Jun 2022 09:37 AM (IST)

    ’10 तारखेचा निकाल झांकी है, 20 तारीख अभी बाकी है’भाजप आमदारांची विधानभवना बाहेर घोषणाबाजी

  • 11 Jun 2022 09:36 AM (IST)

    राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहावे उमेदवार संजय पवार पराभूत

  • 11 Jun 2022 09:34 AM (IST)

    जाणून घ्या राज्यसभेचा निकाल

  • 11 Jun 2022 09:31 AM (IST)

    तेल हि गेलं तूप हि गेलं हाती आलं धुपाट अशी सेनेची अवस्था

    शिवसेना महाविकास आघाडीची ढ टीम आहे मतांचं गणित फसलं

    कारकुनी करणारे कारकुनी करणार निवडणूक जिंकू शकत नाही ( राऊतांना टोला ) हे सिद्ध झालं

    महाविकास आघाडीचं गर्वाचं घर खाली झालं याचे सोकॉल्ड चाणक्य फसले

    महाविकास आघाडीच्या किल्ल्याच्या विटा निघायला सुरुवात

    सेनेत हिंमत असेल तर आता विधान परिषद निवडणूक लढवू दाखवा

    महाभारतातील संजयला दिव्यदृष्टी  होती ह्या संजयना दृष्टी अधू झालीय आणि दृत्रष्टला मिसगाईड करत आहे त्यामुळे हा पराभव

    हिंदुत्व असलेला पक्ष एमआयएम आणि सपा च्या दाढ्या कुरळवून सुद्धा अपयश

    तेल हि गेलं तूप हि गेलं हाती आलं धुपाट अशी सेनेची अवस्था