मुंबई : राज्यातलं वातावरण सध्या विधान परिषद निवडणुकीने (Maharashtra Vidhan Parishad Election) ढवळून निघालं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. उद्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे करण्यात येत आहेत. तर दोन्ही बाजुने अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याकरिता पळापळही सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता महाविकास आघाडी यावेळी जास्त सावध भूमिका दिसून येतेय. तसेच राज्यसभेतील पॅटर्न पुन्हा पाहायला मिळेल असा दावा आता भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या सर्वात वेगवान अपडेट तुम्ही याठिकाणी पाहणार आहात…
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबईतील पवईत टपरीवर बसून खाल्ले चहा बिस्किटे
विधान परिषद निवडणुकीत आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारांची मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये
सर्वपक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेल मध्ये असतांना आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू मात्र बिनधास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवर जाऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अगदी सामान्यांसारखं बसून बच्चू कडू यांनी चहा बिस्कीटवर ताव मारला..
आज बैठकीत अजीत पवार सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार…
आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस आहे
या बैठकिनंतर तो साजरा करण्यात येणार
काही वेळात अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित बैठक पार पडणार
बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
एकत्र पद्तीने आम्ही नियोजन करत आहोत.
मित्र पक्ष देखील अमच्या सोबत आहेत.
पसंतीक्रमांकाच्या मतांबाबत बैठकीत चर्चा झाली.
त्यानुसार आम्ही मतदान करणार अहोत.
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.
जर बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली तर ती नियोजनाबाबत होईल.
राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये आलो आहे
माझं मत राष्ट्रवादीलाच… मतावर ठाम…।।
राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी अविश्वास दाखवला होता
मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आहे, शिवसेनेवर नाराजी अजून आहे
थोड्या वेळात हॉटेल वेस्टीन मध्ये होणार सुरवात
राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यावर आता सेनेकडून घेतली जातेय काळजी
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बैठकीसाठी दाखल.
शिवसेनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे पोहचले
मी माझ्या 30 वर्षाच्या कार्किर्दीत मतदानासाठी हॅाटेलमध्ये राहीलो नाही
मी जे बोलतो ते करतो कारण तसे मी ठरवले तर सगळ्यांना फसवू शकलो आसतो
पण मी फसवाफसवीचे राजकारण करत नाही
क्षितीज ठाकूर मतदानाला येणार की नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही
NOT FOR SALE आशी पाटी आम्ही लावलेली आहे
घोडाबाजारच्या ऑफर येत नसतात, आशा ऑफर कोणी देत नसतो
आम्ही फक्त मतदार संघातील कामाच्या आढाव्यावर चर्चा करत आसतो
आमच्या मतदारसंघाच्या विकासाला जो मदत करेल त्याला आम्ही उद्या मतदान करू
मुख्यमंत्र्यांचं विधान हे हास्यास्पद विधान आहे.
या अगोदर दोन वेळा शिवसेना फुटली आहे
एकदा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात फुटली तर एकदा नारायण राणे यांच्या नेतृत्वात.
भारतीय जनता पार्टीत असे कधीच झाले नाही त्यांचं भाष्य हे हास्यास्पद आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना फुटली स्वतःच्या कुटुंबातले सख्खे चुलत भाऊ फुटले त्यांनी नवीन स्थापन केला. असं वाक्य वापरण्याचा अधिकार त्यांना नाही आहे.
कटकारस्थाने राज्य आणि राजकारण चालत नाही बरोबर आहे. कटकारस्थान करून शिवसेना 20 ऑक्टोंबर 2019 ला सत्ता घेऊ शकता. पण सत्यावर विजय प्राप्त करू शकत नाही.
सामना सुरु होणार होता पण तितक्यात बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळाडू पुन्हा पॅव्लेयिनमध्ये गेले आहेत. सामना सुरु होण्याच्यावेळी पाऊस येईल असा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तवला होता.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येणार अपक्ष आमदारही भाजपला मतदान करणार.
ज्याप्रमाणे राज्यसभेची जागा निवडून आली त्याप्रमाणे ही जागा सुद्धा निवडून येणार
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.
अनेक शिवसैनिकांना वाटते भाजप सोबत राहिले पाहिजे त्यामुळे कदाचित शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे.
एक तास झाली बैठक
कांग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव…
मुंक्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार कांग्रेस नेते
मविआची महत्वाची बैठक…