मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) निकालापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसलाय. कारण, काँग्रेसनं भाजपचे आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. टिळक आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांचा वापर केला. हा गोपनीय मतदानाचा भंग असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा तर निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत घटनात्मकरित्या मतदान करून माझी पक्षाप्रती असलेली जबाबदारी पार पाडली.
राष्ट्र प्रथम ही आमच्या पक्षाची शिकवण असून राष्ट्राच्या भल्यासाठी भाजपापेक्षा उत्तम पर्याय नाही, असा माझा विश्वास आहे.
यापुढेही आवश्यकता भासल्यास मी सदैव माझ्या पक्षासाठी हजर असेन. https://t.co/WiPUTKjKSM
— Mukta Tilak (@mukta_tilak) June 20, 2022
राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. तसं पत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मेलद्वारे पाठवलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर विधान परिषदेची मतमोजणी सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसनं मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आता लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. अशावेळी काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळतेय.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र @ChDadaPatil आपले मोलाचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच उर्जास्त्रोत ठरतात, पक्षाने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कोणत्याही कठीण प्रसंगात तडा जाऊन देणार नाही. यापुढेही मी आपला विश्वास जपण्यास सदैव कर्तव्यतत्पर राहील. https://t.co/f3qvtLq3Ws
— Laxman Jagtap (@iLaxmanJagtap) June 20, 2022
महाविकास आघाडीने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसनं घेतलेला आक्षेप असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. हे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेला या दोन्ही आमदारांनी स्वत: मतदान केलं होतं. आता त्यांनी सही स्वत: केली आणि मतपत्रिका दुसऱ्याच्या हातून मतपेटीत टाकली. दहा दिवसांत असा काय फरक पडला? असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय.