महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय?

| Updated on: May 27, 2019 | 9:11 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेबाबतची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. या निकालावरुन देशात मोदी लाट असल्याचं सिद्ध होतंय. मात्र महाराष्ट्रात जर उद्या […]

महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय?
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेबाबतची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. या निकालावरुन देशात मोदी लाट असल्याचं सिद्ध होतंय. मात्र महाराष्ट्रात जर उद्या निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल? महाराष्ट्रातही पुन्हा युतीचेच सरकार येणार का? काँग्रेस-राष्ट्रवादीला जनता यावेळी तरी संधी देणार का? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न टीव्ही 9 मराठीने केला आहे.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन, टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच लाट दिसत आहे.  आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या  288 पैकी 217 जागा भाजप-शिवसेना युतीला मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 60 आणि अपक्ष/इतर पक्षांना 11 जागा मिळण्याचे संकेत आहेत.

विभागमहायुतीमहाआघाडीइतर
विदर्भ (62)511100
उ. महाराष्ट्र (35)260801
प. महाराष्ट्र (68)442400
ठाणे+कोकण (39)270606
मराठवाडा (48)390603
मुंबई (36)300501
एकूण - 2882176011
 महायुतीमहाआघाडीइतर/अपक्ष
महाराष्ट्र विधानसभा (288)2176011

विदर्भ

विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 62 जागा आहेत. लोकसभेच्या दहा जागांपैकी भाजप आणि शिवसेना युतीनं 8 जागांवर दणदणीत विजय मिळवत विदर्भावरचं वर्चस्व कायम राखलं. अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे दिग्गज खासदार आनंदराव अडसूळ यांना आसमान दाखवलं तर चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळा धानोरकरांनी पाणी पाजलं.

विधानसभेला काय होऊ शकतं?

विधानसभेसाठी विदर्भात आज निवडणुका झाल्यात तर 62 पैकी महायुतीला तब्बल 51 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला  केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. इथे 12 जागांवर काँटे की टक्कर दिसेल. तिथे वंचित फॅक्टर पाहायला मिळू शकतो.

महाराष्ट्राचा महापोल विदर्भाचं चित्र कसं असू शकतं?

  • एकूण जागा – 62
  • महायुती – 51
  • महाआघाडी – 11

विदर्भातील महत्त्वाचे अपडेट

  • अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अडचणीत
  • दर्यापूर, मेळघाटातील भाजपची जागा धोक्यात
  • 12 ठिकाणी वंचित फॅक्टर


उत्तर महाराष्ट्र – एकूण जागा 35

  • उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 26 जागांचा अंदाज
  • उत्तर महाराष्ट्रात आघाडीला फक्त 8 जागांचा अंदाज
  • उत्तर महाराष्ट्रात माकपाला एक जागा
  • उत्तर महाराष्ट्रात 8 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
  • नाशकात भुजबळ पिता-पुत्राची जागा धोक्यात
  • छगन भुजबळ, पंकज भुजबळ यांची जागा धोक्यात
  • वंचित-आघाडी झाली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा

उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

  • छगन भुजबळ पिता पुत्र अडचणीत
  • महायुतीला 26 जागांचा अंदाज
  • आघाडीला फक्त 8 जागांचा अंदाज
  • 8 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी

पश्चिम महाराष्ट्रात एकूण जागा – 68

  • पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 44 जागांचा अंदाज
  • पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला फक्त 24 जागांचा अंदाज
  • वंचित आघाडी 8 ठिकाणी प्रभावी
  • सांगलीसह सोलापूरमध्ये वंचित फॅक्टर
  • पश्चिम महाराष्ट्रात 8 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची जागा धोक्यात
  • जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंची जागा धोक्यात
  • अजित पवारांनी भरसभेत दिलं होतं खुलं आव्हान
  • सोलापुरात प्रणिती शिंदेंचीही जागा धोक्यात
  • हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील सुरक्षित


ठाणे आणि कोकण एकूण जागा 39

  • कोकणात महायुतीला 27 जागांचा अंदाज
  • आघाडीला फक्त 6 जागा, शेकाप 2
  • बहुजन विकास आघाडीला 3 जागांचा अंदाज
  • स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाला 1 जागा
  • 18 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
  • वंचितला सोबत घेतलं तरच आघाडी तरणार
  • कोकणात काही ठिकाणी वंचित फॅक्टरचा प्रभाव
  • भास्कर जाधव यांची जागा धोक्यात
  • कोकणात नारायण राणेंना फक्त एक जागा

मराठवाडा  – एकूण जागा  48

  • महायुती – 39
  • महाआघाडी – 06
  • MIM – 2
  • अपक्ष/इतर – 01

मराठवाड्यात महायुतीला 39 जागांचा अंदाज

  • मराठवाड्यात आघाडीला फक्त 6 जागांचा अंदाज
  • मराठवाड्यात एमआयएमला 2 जागा, अपक्ष 1
  • वंचित आघाडी 18 ठिकाणी प्रभावी
  • मराठवाड्यात 18 जागांवर वंचित फॅक्टर प्रभावी
  • मराठवाड्यात महायुतीचा बोलबाला
  • वंचितला सोबत घेतलं तरच आघाडी तरणार
  • राजेश टोपे, अब्दुल सत्तार यांची जागा धोक्यात
  • राणा जगजितसिंह, राहुल मोटे यांची जागा धोक्यात


मुंबईकरांच्या मनात काय? –  एकूण जागा – 36

  • मुंबईत महायुतीला 30 जागांचा अंदाज
  • मुंबईत आघाडीला फक्त 5 जागा मिळण्याची शक्यता
  • मुंबईत 36 पैकी 1 जागा अपक्षला
  • मुंबईत शिवसेनेच्या 2 जागा धोक्यात
  • मुंबईत काँग्रेसच्या 3 जागा धोक्यात
  • मुंबईत मोठा भाऊ भाजपा, छोटा भाऊ शिवसेना
  • मुंबईत भाजपाच्या 17 जागा, शिवसेनेच्या 13 जागा

लोकसभेच्या निकालानुसार 288 जागांचा अंदाज आणि आकड्यांच्या गणितानुसार –

  • महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड
  • महायुतीला राज्यात 288 पैकी 217 जागा
  • 288 पैकी महायुती-217, महाआघाडी-60, इतर 11
  • राज्यात अंदाजे 47 ठिकाणी वंचित फॅक्टर प्रभावी
  • राज्यात भाजपाच मोठा पक्ष राहण्याचा अंदाज
  • राज्यात दुस-या स्थानी शिवसेना राहील