पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी विकेंड लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजनांचा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपसह मनसेनंही घेतलाय. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन, कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला एक रुपयाही दिला नाही, अशी टीका केलीय. (Announce package for ordinary citizens, demand of Chandrakant Patil to Thackeray government)
राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण आतापर्यंत सर्व सामान्य लोकांना एक रुपयाही दिला नाही. सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर करा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलीय. राज्य सरकारला विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यात सर्वसामान्य नागरिकांना पॅकेज देण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. त्याबाबत सरकार काय करणार? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यात पीएमपीएमलची बस सेवा बंद करण्यात आली आहे. मग कामगार वर्ग, सामान्य माणसाने प्रवास कसा करायचा? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
राज्य सरकारने कोणत्याच घटकातील एकाही व्यक्तीला आर्थिक मदत केलेली नाही. आमदारांना न मागता निधी वाढवून दिला. आमदार पळून जाऊ नयेत म्हणून निधी वाढवला. हीच मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना करायला हवी होती, असं पाटील म्हणालेत.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांनी एक आव्हान दिलंय. दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागल मतदारसंघात मतांचं विभाजन करुन ते निवडून येतात. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफांना दिलं आहे.
>> उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
>> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार
>> राज्यात सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी असेल
>> राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
>> सर्व बांधकामे सुरु राहतील
>> सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार
>> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
>> शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार
>> सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक
>> 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
संबंधित बातम्या :
Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद
Announce package for ordinary citizens, demand of Chandrakant Patil to Thackeray government