नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा (farmer loan waiver) केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver) सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कोणतेही हेलपाटे न घालता किंवा कोणतीही अट न घालता ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावे लागणार आहे ही एकच अट असेल असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल?
या कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंट देण्यात येतील. यासाठी कोणतीही ऑनलाईन नोंदी करावी लागणार नाही. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्याला कुठेही हेलपाटे घालावे लागणार नाही. तसेच कोणीही रांगेत उभे राहा. हे करा, ते करा असे यावेळी होणार नाही. असे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले.
गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांना पत्नीला घेऊन रांगेत उभे राहावे लागले होते. पण यावेळी असे होणार नाही.
कर्जमाफी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आयडेंटीफिकेशन करण्यासाठी बँकेत जावं (farmer loan waiver) लागेल.
ज्यावेळी पैसे वर्ग करु, त्याने जाऊन त्याचे आयडेंटीफिकेशन करावं. असे दोन टप्पे आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितले की माझं नाव————————– हा माझा आधार कार्ड क्रमांक. त्यानंतर त्याचे थम इम्प्रेशन घेतलं जाईल आणि त्याच्या अकाऊंटवरची रक्कम वजा होईल.
त्यानंतर त्याला सर्टीफिकेट देण्याची व्यवस्था एकाच जागी एकाच वेळी करण्यात येणार आहे. त्याला महाराष्ट्रात जाऊन हेलपाटे घालण्याची गरज नाही.
अर्थमंत्री जयंत पाटील यांचं ट्वीट
“आज आम्ही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही ही भूमिका घेतली आहे.
या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले आहे, असं ट्विट जयंत पाटील यांनी (farmer loan waiver) केलं.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा न केल्याचा निषेध करत सभात्याग केला.