महायुतीचं जागा वाटप आमदारांच्या संख्येवर ? छगन भुजबळ यांच्या विधानाने युतीला टेन्शन?

| Updated on: Mar 07, 2024 | 5:16 PM

ठाण्यात राहुल गांधी येत असून महाआघाडीची सभा आहे याबद्दल विचारता, भुजबळ यांनी, 'सर्व पक्ष येणार, आव्हान करणार, लोकशाहीची प्रक्रिया आहे. लोक ऐकतील आणि ठरवतील. राहुल गांधी यांनी श्री राम काल्पनिक पुरुष असल्याचे म्हटले आहे यावर प्रतिक्रीया विचारली असता त्यावर मी बोलणार नाही असे भुजबळ यांनी सांगितले.

महायुतीचं जागा वाटप आमदारांच्या संख्येवर ? छगन भुजबळ यांच्या विधानाने युतीला टेन्शन?
chhagan bhujbal
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 7 मार्च 2024 : लोकसभेच्या निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. एकीकडे महाआघाडीचे जागा शेअरींग वरुन वाद सुरु असताना महायुतीच्या जागा वाटपावरुनही गोंधळ सुरु आहे. त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात महायुतीचं जागा वाटपात एकनाथ शिंदे आणि आमचे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ) सारखे आमदार असल्याने त्यानुसार जागा वाटप व्हावे अशी मागणी केली आहे.

नाशिकची जागा जर आम्हाला भेटली तर पक्ष जो निर्णय घेईल तो येथे निवडणूक लढवले असेही भुजबळ यांनी सांगितले. जो उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे त्यांनाच जागा देण्यात याव्यात, आम्ही किती काम केले आहे हे लोकांना माहीती आहे असेही त्यांनी सांगितले. नाशिकच्या आरक्षित भुखंडावरुन वाद सुरु आहे. आरक्षित भुखंडाला धक्का लागू नये अशी आपली भूमिका आहे. आपण आयुक्तांना सांगितले की योग्य तो निर्णय घ्यावा असेही भुजबळ म्हणाले.

रामदास कदम यांनी महायुती जागा वाटपावरुन भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्याबद्दल विचारता भुजबळ यांनी त्यावर मी सध्यातरी बोलणार नाही असे सांगितले. लवासा सिटी प्रकरणात शरद पवार यांनी कोर्टात धाव घेतली आहे. याबद्दल विचारले असता तपास यंत्रणेकडून काही झाले तर कोर्टात जाता येते. त्याचा लोक फायदा घेतात असे भुजबळ म्हणाले. आमदार अपात्र प्रकरणात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्याबद्दल बोलताना मी वकील किंवा न्यायाधीश नाही. त्यामुळे जे होईल ते पाहत रहायचे असे भुजबळ म्हणाले. नाशिक येथे मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे याबद्दल विचारले असता लोकशाही आहे. पक्षवाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहीजेत असे त्यांनी सांगितले.

एवढं डिपॉझिट कोठून आणणार ?

मराठा संघटनेने निवडणूक बलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच एका मतदार संघात अडीचशे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याबद्दल बोलताना भुजबळ यांनी ही निवडणूक रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. इतके उमेदवार उभे करायचे तर डिपॉझिट कोट्यवधी रुपयांचे लागेल. हे कितपत शक्य आहे मला माहिती नाही. आपल्या मागणीसाठी काहीतरी अडथळा करणे योग्य नाही असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

अरुणाचलात निवडणूका लढविणार

अरुणाचल येथील 8 आमदार आमच्यासोबत आहेत. तेथे लोकसभेसोबत विधानसभाची निवडणूका आहेत. त्यामुळे त्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट झाले नव्हते. तेव्हा शरद पवार यांनी तिथल्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांची भेट तेथील आमदारांनी घेतली आहे. तेथे नेमकी काय बोलणी झाली हे माहीती नाही, मात्र आम्ही तेथे निवडणूका लढविणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.