मुंबई : उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उत्तर प्रदेशचे नेताजी अर्थात मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर मैनपूर या लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक (Mainpuri by Election Result 2022) लागली. या लोकसभा निवडणुकीसाठी मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई अर्थात अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांना सपाने उमेदवारी दिली. या जागेसाठीही निवडणूक पार पडतेय. आज या जागेचा निकाल लागतोय. या ठिकाणी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना किती मतं पडली आहेत? पाहुयात…
डिंपल यादव या सध्या 16 हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. सध्याच्या कलांनुसार डिंपल यादव यांना 27 हजार 862 मतं मिळाली आहेत.
भाजपकडून रघुराज शाक्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना 10 हजार 932 मतं मिळाली आहेत. मैनपुरीमध्ये 54.37 टक्के मतदान झालं, तर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची ही टक्केवारी 57.37 टक्के होती.
यादव कुटुंबाचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा राहिला. मुलायमसिंह यादव यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे डिंपल यादव यांच्या जिंकण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत होते. तसंच होताना दिसत आहे. मुलायमसिंह यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर डिंपल यादव आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
भाजपचे नेते शिवपाल यादव यांच्या निकटवर्तीय असलेल्या रघुराज शाक्य यांना भाजपने उमेदवारी दिली. रघुराज शाक्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रघुराज यांचा विजय होईल, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत होता. मात्र सध्या ते 16 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
आज अन्य निवडणुकांचाही निकाल लागतोय. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे तर हिमाचलमध्ये काँग्रस पुढे असल्याचं पाहायला मिळतंय.