नांदेडमध्ये मोठी राजकीय घडामोड; BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश

| Updated on: Feb 05, 2023 | 8:46 PM

नांदेड येथील सभेला मोठी गर्दी झाली होती. के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली. तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयाला हात घातला.

नांदेडमध्ये मोठी राजकीय घडामोड; BRS पार्टीमध्ये या चार माजी आमदारांचा प्रवेश
के. चंद्रशेखर राव
Follow us on

नांदेड : महाराष्ट्रातील चार माजी आमदार (Former MLA) यांनी मुख्यमंत्री के सी आर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पार्टीमध्ये प्रवेश केला आहेत. याशिवाय राज्यातील महत्त्वाचे नेते हेही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यामुळं भारत राष्ट्र समितीची राज्यात एंट्री झाली आहे. गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम (Deepak Atram), उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील दिगंबर भिसे या चार माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. याशिवाय राजन कोडक, संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे व ढोलीराम काळदाते या महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांचा समावेश आहे.  गडचिरोली जिल्हा परिषदेच्या 5 झेडपी सदस्यांनी BRS पक्षात प्रवेश केला. यासाठी राज्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आपल्या पक्षाचा प्रवेश केला.

 

शेतकरी, कामगार केंद्रबिंदू

बिहारमधून त्यांनी BRS ला देशात नेण्यास सुरुवात केली. आज नांदेडमधून त्यांनी महाराष्ट्रात एंट्री केली. त्यामुळं राज्यातील राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी देशपातळीवर पक्ष नेण्याचे आवाहन केलं.

हे सुद्धा वाचा

भारत राष्ट्र समिती तेलंगणापुरती मर्यादित होती. मात्र देशातील वातावरण पाहून आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी तयार झालो आहोत. संपूर्ण देशभरात आम्हाला समर्थन मिळत आहे, असं चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांसोबत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने ११९ पैकी ९० जागा जिंकून बहुमत मिळविले. के. चंद्रशेखर राव २ जून २०१४ रोजी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री झाले. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले.

नांदेड येथील सभेला मोठी गर्दी

नांदेड येथील सभेला मोठी गर्दी झाली होती. के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली. तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या विषयाला हात घातला.

महाराष्ट्रात केसीआर यांच्या आणखी सभा होणार आहेत. त्यामुळं ठिकठिकाणी भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा मिळू शकतो. वेगळा विदर्भ, मराठवाडा अशी मागणी घेऊन बीआरएस राज्यात उतरू शकते.