मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीत(Guwahati) झालेल्या बंडखोऱांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी भूमिका ही आता बंडखोर आमदारांची असल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीतल्या बैठकीही यावरच चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास एक तास ही बैठक चालली आहे.
एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका आहे. यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. हा सगळा गोंधळ असताना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी बंडखोरांकडून करण्यात आली आहे.
गेल्या दीड तासापासून एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत खलबतं सुरू आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत कसं आणायचं याबाबत चर्चा सुरू आहे.
आमदारांच्या अपात्र करण्याच्या नोटिसा उपाध्यक्षांकडून मिळालेल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी उत्तर कसे देणार, हा प्रश्न बंडखोर आमदारांपुढे आहे. उत्तर सोमवारपर्यंत दिले नाही तर अपात्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे याविरोधात हायकोर्टात जाण्याचे ठरवण्यात आले आहे.
या बंडामागे भाजपा पडद्याआड असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंडखोरांनी केली तर भाजपाची काय भूमिका असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ही दावा केलीय. या जिल्ह्यात प्रत्येकाला प्रत्येकाचा मान द्या. या सरकाच्या गडबडी चालल्या आहेत. म्हणून मी बोलत नाही. मात्र अधिकाऱ्यांना प्रटोकॉल समजूत नाही का? अधिकाऱ्याचं काम आहे. पत्रिका देणं, इतका निर्लज्ज अधिकारी कोण आहे? जो फोनवर बोलतो. ही काय चांगली पद्धत नाही. उलट आम्ही विरोधी पक्षात असल्याने आम्हाला असं बोलायला भेटतंय. दोन तीन दिवसांनी हे पण बंद होणार आहे, असे सूचक विधान दानवे यांनी केलं आहे.