ठाकरे गटाच्या नेत्याची थेट मंत्र्यालाच ठस्सन, म्हणाला, “एक तर तू…”

| Updated on: Aug 26, 2024 | 2:19 PM

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट महायुतीतील मंत्र्यांला चॅलेंज दिले आहे. यामुळे आता नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याची थेट मंत्र्यालाच ठस्सन, म्हणाला, एक तर तू...
Follow us on

Malegaon Outer Assembly constituency : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल काही महिन्यातच वाजणार आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट महायुतीतील मंत्र्यांला चॅलेंज दिले आहे. यामुळे आता नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सध्या नाशिकच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने त्यांच्या मतदारसंघातील विविध भागात प्रचारसभा घेत आहेत. आता नुकतंच मालेगावमध्ये घेतलेल्या एका प्रचारसभेत अद्वय हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. “एकतर मी राहीन किंवा तू राहशील”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी केले आहे.

ही माझ्यावर विश्वास ठेवणारी मते आहेत

“माझ्यासाठी ही लढाई शेवटची आहे. त्यामुळे एकतर तू राहशील किंवा मी राहिन. मी ठाकरे गटात प्रवेश केला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला आधीच सांगितले होते की, तुला तुरुंगात जावे लागेल. मी तुरुंगातून उद्धव साहेबांना पत्र लिहून शोभा बच्छाव निवडून येतील, त्यांनाच उमेदवारी द्या असे सांगितले होते. शोभा बच्छाव यांना मिळालेली मते ही माझ्यावर विश्वास ठेवणारी मते आहेत. शोभा बच्छाव पुढील मंत्री मंडळात मंत्री म्हणून राहतील”, असे अद्वय हिरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी लढायचं आहे. माझी उमेदवारी निश्चित आहे. लाडकी बहीण, जुनी पेन्शन योजनेवरील खर्च पहिला तर पुढे सरकार चालवायला पैसे राहतील का?ज्या लोकांशी मी संबंध ठेवले नाही, त्याच क्रिमिनल लोकांबरोबर नऊ महिने राहिलो. अबू सलेम माझ्या बाजूला राहत होता”, असा खुलासाही अद्वय हिरे यांनी केला.

“जेलमध्ये गेलो तरी मी जेलमधून निवडणूक लढवणार”

“काहींना पैशांची मस्ती आली आहे. मालेगाव तालुक्याचे लोक पैसे तुमचे घेणार पण मत मलाच देणार आहेत. मी पुन्हा देखील जेलमध्ये गेलो तरी मी जेल मधून निवडणूक लढवणार. लोकांची तिकीट ठरवणारा मी आणि तुम्ही माझे तिकीट दिल्लीला जाऊन कट करणार कसे? मी आता माझ्या तालुक्यात निवडणुकीला उभा राहणारच. या पुढे विचारपूर्वक माझ्या बरोबर या”, असेही अद्वय हिरे यांनी म्हटले.

“मी जेलमध्ये जायला आता घाबरत नाही. फोटो, व्हिडीओ आणि खोटी माहिती तयार करुन सोशल मीडियावर शेअर केली जाते. राजकारणासारखं राजकारण करा. मी डोक्यात राग घातलेला नाही तो मला घालायला लावू नका, नाहीतर माझी निशाणी मशाल आहे मी जाळल्याशिवाय राहणार नाही”, असे अद्वय हिरे यांनी म्हटले.