मुंबई : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनानंतर विविध पक्षातील राजकीय नेते, कलाकार, क्रीडापटू यांच्यापासून सर्वसामान्य जनताही हळहळली. सुषमा स्वराज यांच्या भेटीत घडलेले किस्से आणि आठवणी अनेक जणांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्यांना किडनीदानाची इच्छा एका मुस्लिम तरुणाने व्यक्त केली होती. तो मुजिब अन्सारी (Mujib Ansari) ही सुषमा यांच्या निधनाने हळहळला.
‘तीन वर्षांपूर्वी मी माझी किडनी सुषमा स्वराज यांना देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मुस्लिम समाजातील अनेकांनी मला ट्रोल केलं. मात्र सुषमा मॅमसारख्या व्यक्ती धर्म, जात यांच्या पल्याड आहेत. मला त्यांच्यासाठी खूप दुःख होत आहे.’ अशा भावना मुजिबने ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.
#sushmaswaraj
3 years ago I offered my kidney to her, many Muslims started trolling me for that, but people like Sushma Mam are above all religions, caste and boundaries.
I am feeling extremely sad for her. ? pic.twitter.com/KLtAui9axP— Er Mujib Ansari?? (@MujibAnsariMBA) August 6, 2019
सुषमा स्वराज यांची किडनी तीन वर्षांपूर्वी निकामी झाली होती. त्यावेळी अनेक जणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ‘बंधूंनो, खूप खूप आभार. किडनीला धार्मिक बंधन नसतं.’ असं ट्वीट सुषमा यांनी केलं होतं. मुस्लिम तरुणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा यांनी भावना बोलून दाखवल्या होत्या.
Thank you very much brothers. I am sure, kidney has no religious labels. @Mujibansari6 @vicechairmanmpc @ali57001
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) November 18, 2016
मुजिब काय म्हणाला होता?
‘सुषमा स्वराज मॅम, मी बसप समर्थक आणि मुस्लिम आहे. पण मला तुम्हाला किडनीदान करण्याची इच्छा आहे. तुम्ही माझ्यासाठी मातेसमान आहात. अल्ला तुम्हाला आशीर्वाद देओ’ असं मुजिबने ट्वीट केलं होतं.
mam I am a BSP supporter and a Muslim,bt I want 2 donate my kidney 4 u,4 me u r like my mother figure,
May allah bless u.— Er Mujib Ansari?? (@MujibAnsariMBA) November 18, 2016
सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना नवसंजीवनी लाभली होती. पुन्हा एकदा त्या धडाडीने देशाचा आवाज जगासमोर मांडत होत्या.
सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.
सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.
सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द
2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री
2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री
जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री
ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)
मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)
सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी
विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द
Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!
57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!
Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!