मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. त्यानंतर संध्याकाळी 5 राज्यांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. त्यात मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतोय. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेस अवघ्या एक आकडी संख्येवर अडकून पडेल, असं एक्झिटपोलमधून सांगण्यात येत आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. या जागांसाठी दोन टप्प्यात 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडलं.
काँग्रेस आघाडी – 12 ते 17
भाजप – 32 ते 38
एनपीएफ – 3 ते 5
अन्य – 4 ते 5
काँग्रेस आघाडी – 31
भाजप – 17
एनपीएफ – 3 ते 5
अन्य – 12
काँग्रेस आघाडी – 10 ते 14
भाजप – 23 ते 28
एनपीएफ – 5 ते 8
अन्य – 8 ते 14
काँग्रेस आघाडी – 15
भाजप – 32
एनपीएफ – 4
अन्य – 9
काँग्रेस आघाडी – 12 ते 16
भाजप – 23 ते 27
एनपीएफ – 3 ते 7
अन्य – 12 ते 20
काँग्रेस आघाडी – 4 ते 8
भाजप – 33 ते 43
एनपीएफ – 0
अन्य – 10 ते 23
एक्झिटपोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 56-61 जागा मिळताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पंजाबच्या सत्तेचं गणित बदलल्यास आपच्या हाती दिल्लीपाठोपाठ पंजाब सारखं महत्त्वाचं राज्य येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबमध्ये काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या स्थानावर जाणार असल्याचं चित्रं आहे. त्यातही भाजपला केवळ एक ते सहाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या :