मराठा आरक्षणावरुन पलटी माराल तर तर तुमचं सरकार मी पलटी केलंच म्हणून समजा अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला आव्हान दिले आहे. आपल्याकडून जातीवाद होणार नाही. गावातला ओबीसी आणि मराठा हा एकच आहे. छगन भुजबळ यांचे दंगल घडविण्याचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही असे आवाहन करीत मनोज जरांगे यांनी यावेळी भुजबळ यांचा नेहमीप्रमाणे खास शैलीत एकेरी उल्लेख करीत जरांगे पुढे म्हणाले की छगनभाऊ…तुझा असा इंगा जिरवतो…तु आमच्या आमच्यात काडी लावतो व्हयं…बेट्या टांगा उलटा नाही बांधला तर सांग अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे. येत्या 13 जुलैला बैठक घेऊन महाराष्ट्रात 288 जागा लढायच्या की पाडायच्या याचा निर्णय घेऊ असेही यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले.
तुमच्या सहकार्यामुळे आपण आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. कितीही कुणी जातीवाद केला. आपल्यावर टीका केली तरी आपण आपल्याकडून जातीवाद करायचा नाही. आपण गावातील आपल्या ओबीसी बांधवांना विरोधक मानायचं नाही. त्यांना दुखवायचं नाही. आपल्या शेजारच्या गावातील लोकांनी जरी टीका केली जरी त्यांना विरोध करायचा नाही. येवल्यावरुन आपल्यात दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला आपण दाद द्यायची नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. कारण भुजबळ दंगल घडवून निघून जातील आपल्याला गावात रहायचं आहे. म्हणून त्याला फशी पडू नका आणि प्रतिसाद देऊ नका असे आवाहन यावेळी जरांगे यांनी केले आहे.
आपलं आंदोलन दबाव टाकून स्थगित करायला लावले आणि भुजबळांनी दबाव आणून ओबीसी आंदोलनाला परवानगी द्यायला लावली असा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला. 1884 पासून 150 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण दिलेले आहे. धनगर बांधवांचा कोणता नेता आहे, तुम्हाला आमच्यानंतर येऊनही आरक्षण मिळालं पण आम्ही विरोध केला नाही. पण आमचं आधीपासून आरक्षण असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. धनगराचं आरक्षण एसटीत आहे. तर एसटीत त्यांना आरक्षण द्यावे. येवलावाला दंगली घडवायच्या बेतात आहे. वाडीत जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. वाडीत आपण शिवभाऊ म्हणून मी जात नव्हतो. तुम्ही धडक देता म्हणून मी धडक देणार नाही, तुम्ही आंदोलन केला तुम्हाला अधिकार आहे, परंतू एखाद्या चुकीमुळे शिवा भावात नाराजी बसू नये असेही जरांगे यावेळी म्हणाले.
आम्ही उलट त्याच्यामुळे एकत्र आलो आहोत. आपला समाज एकजूट राहिला पाहिजे. आमचं हैदराबादचं गँझेट आहे ते सरकारी आहे, आमच्या नोंदी आहेत, त्याला तुम्ही विरोध करताय. हे मराठ्याचं आंदोलन अंतरावलीत सुरू राहणार, कुणी सोबत असल तरी नसल तरीही असेही जरांगे यावेळी म्हणाले. आंदोलनाला करोडो लोकं एकत्र झाली. प्रसिद्धी सवय लागली काय बोलतो ते कळलं नाही. शेवटी समाज मोठा आहे. समाजाला कोणी नाही शिकवू शकत. झाल्या चुका मान्य केल्या. ज्यांनी आम्हाला घोडे लावले, त्यांनाही आम्ही जवळ घेतलं. ही समाजाशी बेईमानी आहे. समाजाच्या विरोधात गेला की राख मिळणार, सगळ्यात बलाढ्य शक्ती मराठ्यांची आहे असेही जरांगे यांनी सांगितले. ते आता मला बदनाम करणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आणि धनगरांना कुणबी नोंद असल्यास ओबासीतून आरक्षण देणार असेही जरांगे यांनी सांगितले.