मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी सॅल्यूट ठोकणारा एक फोटो टाकला आहे. तर अती संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलंय.(Mansukh Hiren murder case finally solved, ATS DIG Shivdeep Lande’s Facebook post)
“अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे”, असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या टीमने 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दुपारी कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींची 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शनिवारी एटीएसने सचिन वाझे यांचीही कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने म्हटलंय की, वाझेची कोठडी 25 मार्चनंतर मिळेल.
मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नरेश धरे असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.
Mansukh Hiren’s death case has been solved: DIG Maharashtra ATS Shivdeep Lande.
Suspended Mumbai Police constable Vinayak Shinde and Naresh Dhare, a bookie were arrested in connection with the death earlier today.
— ANI (@ANI) March 21, 2021
अँटालिया स्फोट प्रकरणापाठोपाठ आता मनसुख हिरेन प्रकरणही एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले असल्याची माहिती एनआयएच्या अधिकारी जया रॉय यांनी दिली आहे. हिरेन प्रकरणही एनआयएकडे गेल्याने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची डोकेदुखी वाढल्याचं सांगण्यात येत असून हे प्रकरण एनआयएकडे जाणं ही आघाडी सरकारची नामुष्की असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, हे प्रकरण NIAकडे सोपवण्यापूर्वीच एटीएसने या प्रकरणाचा उलगडा झाल्याचं म्हटलंय. तशी फेसबुक पोस्ट एटीएसची DIG शिवदीप लांडे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक डेड बॉडी!
Mansukh Hiren murder case finally solved, ATS DIG Shivdeep Lande’s Facebook post