मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भीषण पराभवानंतरही काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज उमेदवारांनी, नेत्यांनी पाठ फिरवली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना बोलविलेल्या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे लोकसभा उमेदवार आलेच नाहीत.
मुंबईत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीकडे पराभूत झालेल्या उमेदवारांनी पाठ फिरवली. मात्र दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड हे एकमेव उमेदवार या बैठकीला हजर होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदी संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर संजय निरुपम नाराज होते. मात्र अन्य उमेदवारही पराभवातून अजून सावरलेले दिसत नसल्याचं चित्र आहे.
मुंबईतील सर्व जागा युतीकडे
मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. विविध जाती-धर्म-भाषेचे लोक मुंबईत राहतात. त्यामुळे कुठलेही नेमके अंदाज बांधता येत नसलेल्या मुंबईत यंदाही प्रत्येक मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला.
संबंधित बातम्या
मुंबईतल्या सहाच्या सहा जागा युतीकडे, पाहा कुठल्या जागेवर कोण विजयी?