मुंबई: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या विरोधात फ्रि वेवर बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्समध्ये आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचा उल्लेख पेंग्विन असा करण्यात आला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या वाढत्या संपत्तीवरूनही शेरेबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या (mumbai) वेशीवरच हे पोस्टर लागल्याने या बॅनर्सकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधलं जात आहे. मराठा युवा सेनासंघटनेने ही पोस्टर्स लावली आहेत.
सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फ्रीवे परिसरात बॅनर्स लागले आहेत. नाव न घेता या दोन्ही नेत्यांवर या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. मराठा युवा सेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दोन पेंग्विन व कुंडीतील वांगी अशा आशयाचे बॅनर लावून जोरदार प्रत्युत्तर देण्यात दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलं. तर एका ताईनं जिने कुंडीत वांगी लावून करोडो रुपये कमवले. आता महाराष्ट्ताला कोरडे उपदेश देत आहे, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे.
तुमच्या दोघांच्या बापानी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले म्हणून राज्यातील तरुण पन्नास वर्ष मागे गेला आहे. बाप काढणं हि आमची संस्कृती नाही. पण सुरुवात तुम्ही केली. शेवट आम्ही करणार, असा इशाराही या बॅनर्सवरून देण्यात आला आहे.
चाळीशी आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके, अशी टीका करतानाच शेतकरी पुत्र मुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्रातील तरुण तुमच्या सोबत कायम आहे, असं मराठा युवा सेना संघटनेचे अध्यक्ष अंकूश कदम यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्र योगदान काय?, असा सवालही अंकूश कदम यांनी केला आहे.