मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत (Marathi celebrity explanation tweets Election again) आहे. अशा परिस्थितीत मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले (Marathi celebrity explanation tweets Election again) होते. यावर टीका झाल्यानंतर मराठी कलाकारांकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमची कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, याबाबत लवकरच भूमिका मांडू, असे स्पष्टीकरण कलाकारांनी दिले (Marathi celebrity explanation tweets Election again) आहे.
“आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हणलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुराळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल, आणि आशा आहे आपल्याला आवडेल सुद्धा. सर्वाच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही,” असे स्पष्टीकरण अभिनेता सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर यासारख्या मराठी कलाकरांनी दिले आहे.
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला (Marathi celebrity explanation tweets Election again) होता.
— Siddharth Jadhav ?? (@SIDDHARTH23OCT) November 15, 2019
— Sai (@SaieTamhankar) November 15, 2019
एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तेची बोलणी सुरु असताना, दुसरीकडे कलाकार असे ट्वीट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. कलाकारांनी आपला भाजपकडून वापर होऊ देऊ नये, असं आवाहन सचिन सांवत यांनी केलं आहे.
ट्विटरवर टीकेचे धनी
दरम्यान, कलाकारांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. तसेच भाजपकडून पैसे घेऊन ट्विट केले आहेत का असा प्रश्न नेटकऱ्यांनी कलाकारांना विचारला आहे.
संबंधित बातम्या :
#पुन्हानिवडणूक, कलाकारांकडून एकसारखे ट्विट, भाजपकडून वापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप