मुंबई : महाराष्ट्रात राजकीय तणातणी सुरु आहे. निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापनेचा (Marathi celebrity tweets Election again) निर्णय घेतला आहे. एकीकडे भाजपने सरकार आपलंच येईल असा दावा केला असताना, महासेनाआघाडीवर (Marathi celebrity tweets Election again) टीका सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्विटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केले आहेत.
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे.
एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तेची बोलणी सुरु असताना, दुसरीकडे कलाकार असे ट्विट करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कलाकारांनी आपला भाजपकडून वापर होऊ देऊ नये, असं आवाहन सचिन सांवत यांनी केलं.
प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी एकच हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करतात हे आश्चर्याचे तर आहेच पण @BJP4Maharashtra ची propaganda मशीनरी किती पोचलेली आहे हे यातून दिसून येते. या कलाकारांनी आपला #भाजपा कडून वापर होऊ देऊ नये. pic.twitter.com/sE58NqmD8l
— Sachin Sawant (@sachin_inc) November 15, 2019
भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. कोब्रापोस्ट ने या अगोदर बाॅलीवुडच्या कलाकारांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी पैसे आॅफर केले जाते हे स्पष्ट झाले आहे. https://t.co/2JwgrTAN0K
— Sachin Sawant (@sachin_inc) November 15, 2019
ट्विटरवर टीकेचे धनी
दरम्यान, कलाकारांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. भाजपकडून पैसे घेऊन ट्विट केले आहेत का असा प्रश्न ट्विटरवर विचारले जात आहेत.
#पुन्हानिवडणूक यांचा बोलविता धनी कोण आहे? pic.twitter.com/FwJBvBWHgO
— Ashok Arunrao Pawar (@AshokArunrao) November 15, 2019
झी टॉकीजचं स्पष्टीकरण
दरम्यान, कलाकारांनी केलेले ट्विट हे झी टॉकीजवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमाशी संबंधित असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र झी टॉकीजने ते फेटाळून लावलं आहे.
सध्या ट्विटरवर वापरला जात असलेला #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग झी टॉकीज अथवा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ कार्यक्रमाशी निगडित असल्याचे वृत्त चुकीचे असून #MFK2019 च्या वोटिंगविषयी आम्ही वेळोवेळी आमच्या अधिकृत हँडलवरून अपडेट्स देत राहू. धन्यवाद. #AaplaZeeTalkies
— Zee Talkies (@ZeeTalkies) November 15, 2019