मुंबई : अंधेरी मुंबई शुक्रवारी चौकाच्या नामकरणाच्या वेळी (Governor Bhagatsingh Koshyari) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या (Mumbai) मुंबईबद्दलच्या विधानाने चोहिबाजूने टिकेची झोड उडाली होती. त्यानंतर त्यांनी आपला खुलासा दिला असून यामध्ये “मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत (Governor) राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या खुलाश्यानंतर आता विरोधक काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अंधेरी मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईचे महत्व कशामुळे टिकवून आहे हे सांगितले. मुंबईतून गुजरात आणि बिहारचे नागरिक निघून गेले तर काय उरणार..? यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्व कसे टिकणार? इतर राज्यातील नागरिकांमुळेच मुंबईला महत्व असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर विरोधकांकडून यावर विधानाला घेऊन जोरदार टिका केली आहे. तर राज्यपाल यांनी त्यांचे काम करावे, मुंबईमध्ये नाक खूपसू नये असे मनसेच्या वतीने सुनावण्यात आले होते. टिकेची झोड होताच त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. कालच्या त्यांच्या विधनानंतर हा त्यांनी खुलासा केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सडकून टिका केली जात आहे. केवळ विरोधकच नाहीतर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी देखील याबाबत मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना बोलणार आहेत. शिवाय त्यांचे वक्तव्य हे बरोबर नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सोशल मिडियामध्येही कोश्यारी यांना टार्गेट केले जात आहे. आता त्यांनी केलेल्या खुलाश्यानंतर विरोधक काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.