बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात शेती पिकांसह शेतजमीनही उद्ध्वस्त झालीय. अशावेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केलीय. बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करुन जिल्ह्यत ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी नमिता मुंदडा यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं आहे. (MLA Namita Mundada’s one-day hunger strike for farmers’ demands)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, परळी या तीन तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठाकरे सरकारनं तत्काळ मदत जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केलीय. नमिता मुंदडा या अतिवृष्टीपासून आपल्या मतदारसंघातील नुकसानाची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी नुकसानाची आढावा घेतला. तसंच शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही नमिता मुंदडा करत आहेत.
जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे केज मतदारसंघातील शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेत पिकांसह, घरे, रस्ते, पूल यांचेही प्रचंड नुकसान झाले. शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या मागण्या राज्य सरकारने तात्काळ मान्य कराव्या यासाठी pic.twitter.com/nIZp4nvWve
— Namita Mundada (@NamitaMundada) October 4, 2021
1. जिल्ह्यात सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
2. शेतकऱ्यांना लवकरात लवकर 2020 व 2021 चा पीक विमा देण्यात यावा.
3. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी.
4. ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुर्दशा झाल्याने त्वरित त्यांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी द्यावी.
5. या वाईट परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत देण्याची यावी.
ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याचं शेती पिकांसह शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावं. नुकसानाची भीषण दृष्य पाहावीत. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहिती नाही. मात्र, लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केलीय.
इतर बातम्या :
‘..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा; अशोक चव्हाणांवर घणाघात
MLA Namita Mundada’s one-day hunger strike for farmers’ demands