बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याचं शेती पिकांसह शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय. (MLA Namita Mundada criticizes Dhananjay Munde over not helping flood-hit farmers)
मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावं. नुकसानाची भीषण दृष्य पाहावीत. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहिती नाही. मात्र, लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केलीय.
बीड जिल्ह्यात तसेच केज विधानसभा मतदारसंघात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर सरसकट 50,000/- (पन्नास हजार) रुपयांची मदत करावी. pic.twitter.com/V0Ks6HBv6N
— Namita Mundada (@NamitaMundada) October 3, 2021
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. त्यावेळी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत असताना पंचनामे कशाचे करता, मदत जाहीर करा, अशी मागणी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंचनामे न करताना थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.
ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची शेकापकडून मागणी, नेमकं प्रकरण काय?
MLA Namita Mundada criticizes Dhananjay Munde over not helping flood-hit farmers