मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार, त्यातही गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही 11 नेत्यांना (Marine Drive Police Send Notice To Mahavikas Aghadi Leaders) मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तत्कालिन राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
त्याची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजावेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
ते 11 नेते कोण?
Raju Shetti | राजू शेट्टींसह 40 जणांवर बारामतीत गुन्हा दाखलhttps://t.co/Xq9baSMcHE@rajushetti #Baramati
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 28, 2020
Marine Drive Police Send Notice To Mahavikas Aghadi Leaders
संबंधित बातम्या :