मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम बस बाई बस या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांची मुलाखत होते. या कार्यक्रमात राजकारणी मंडळीदेखील सहभागी होत असतात. या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं जातं.या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत नाही, असं त्या म्हणाल्या. कवट्या महाकाळ म्हटलं की डोळ्यासमोर कोण येतो, असं विचारल्यावर त्यांनी हटके उत्तर दिलं. शिवाय तात्या विंचूचं नाव घेतल्यावर डोळ्यासमोर कोणं येतं असं विचारल्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. शिवाय त्यांना नवनीत राणांचा (Navneet Rana) फोटो दाखवण्यात आला तेव्हाही त्यांनी इंटरेस्टिंग उत्तर दिलं.
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीये. अश्यात किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत महत्वाचं विधान केलंय. त्यांना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत नाही, असं त्या म्हणाल्या.
कवट्या महाकाळ म्हटलं की डोळ्यासमोर कोण येतो, असं विचारल्यावर त्यांनी हटके उत्तर दिलं. इकसो जेल में भेजूंगा, उसको जेल में भेजूंगा म्हणणारे तेच ते! असं उत्तर त्यांनी दिलं. नाव न घेता त्यांनी किरीट सोमय्या यांच्याकडे इशारा केला. शिवाय तात्या विंचूचं नाव घेतल्यावर डोळ्यासमोर कोणं येतं असं विचारल्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. नको ते नाव घेतलं तर फार अडचण होईल, असं पेडणेकर म्हणाल्यात.
नवनीत राणांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हाही त्यांनी इंटरेस्टिंग उत्तर दिलं. कश्या आहात नवनीत राणाजी… नवनीत राणा म्हणजे दिलेली स्क्रिप्ट एकदम ओके, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.
बस बाई बस या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेतल्या जातात. यात या आधी अमृता फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री क्रांती रेडकर, अभिनेत्री पूजा सावंत यांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखती दरम्यान पाहुण्यांना काही अडचणीचे तर काही उत्कंठा वाढवणारे प्रश्न विचारले जातात.