आशिष शेलार-शरद पवारांची युती… ‘या’ निवडणुकीत संयुक्त गट, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या

| Updated on: Oct 10, 2022 | 4:29 PM

मात्र आता शेलार यांच्याशी युती झाल्यावर शरद पवार गटातील अध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप पाटील आणि अन्य उमेदवारांच्या MCA तील भवितव्याचे काय होणार ? असा प्रश्न आहे.

आशिष शेलार-शरद पवारांची युती... या निवडणुकीत संयुक्त गट, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबईः अवघ्या मुंबईचं लक्ष लागलेल्या एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) कार्यकारिणीच्या निवडणुकीची समीकरणं अचानक बदलली आहेत. कारण निवडणुकीत भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी युती केल्याचं नुकतंच जाहीर केलंय. खरं तर राजकीय शत्रुत्वाचा या निवडणुकांवर फारसा परिणाम होत नाही, मात्र सध्याचं धगधगतं राजकारण पाहता, ते कुठपर्यंत झिरपू शकतं, कुणाचे कुठे हितसंबंध गुंतलेले असू शकतात हे हा उत्सुकतेचा विषय ठरतोय. त्यामुळेच एमसीए निवडणुकीतलं हे चित्र सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.

MCA कार्यकारिणी निवडणुकीत आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कार्यकारिणी निवडणुकीत अचानक कलाटणी मिळाली आहे. शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्याशी युती केल्याचं पत्र जारी झालंय. या दोहोंचा संयुक्त गट जाहीर करण्यात आलाय. या दोघांच्याही स्वाक्षरीचे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आलंय.
हा गट जाहीर करण्याआधी शरद पवार आणि आशीष शेलार यांची दक्षिण मुंबईत भेट झाली. या भेटीनंतरच पवार-शेलार संयुक्त गटाचा निर्णय झाल्याचं म्हटलं जातंय.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. शरद पवार यांच्या गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अर्ज भरला आहे.

मात्र आता शेलार यांच्याशी युती झाल्यावर शरद पवार गटातील अध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप पाटील आणि अन्य उमेदवारांच्या MCA तील भवितव्याचे काय होणार ? असा प्रश्न आहे.

पवार-शेलार संयुक्त गटात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांच्यासह पवरांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हेही आहेत.

आधी जाहीर झालेल्या शरद पवार गटातील बहुतांश उमेदवार पवार-शेलार गटात नाहीत

शरद पवार गटातील उमेदवार अजिंक्य नाईक यांचा पवार-शेलार गटात सेक्रेटरी पदावर कायम आहेत.