मुंबई : विधानसभा निवडणुकीत डावलले गेलेल्या भाजप नेत्यांना नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि विधानपरिषद यांचं तिकीट नाकारले गेलेल्या पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नवी जबाबदारी मिळण्याची चिन्हं आहेत. (Medha Kulkarni Chandrashekhar Bawankule may get New Opportunity in BJP Organizational reshuffle)
भाजपमध्ये जुलै महिन्यात मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत आहेत. भाजपच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मेधा कुलकर्णी यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हं आहेत. तर महामंत्री पदावर आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं. (Medha Kulkarni Chandrashekhar Bawankule)
हेही वाचा : पुण्यात माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला, हाताची बोटे फ्रॅक्चर
विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते.
मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दोनदा संधी डावलली
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट विधानसभा निवडणुकीत कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला होता. चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे नेते आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेली समाज भाजपसोबत होता. पण बावनकुळे तसेच इतर तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला
हेही वाचा : आता विधानपरिषदेलाही डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप
विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. विदर्भात भाजपचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवला होता. मात्र तेली समाजाची मतं फिरल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 30 जागांवर विजय मिळवता आला. विदर्भातली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 30 हजार आणि जास्तीत जास्त 70 हजार तेली समाजाची मतं आहेत.
Mayor Sandeep Joshi Exclusive | तुकाराम मुंढेंनी मला शहाणपण शिकवू नये, महापौरांचं आयुक्तांना उत्तरhttps://t.co/7Ko4qVTnCJ#Nagpur #SandipJoshi #TukaramMundhe
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
(Medha Kulkarni Chandrashekhar Bawankule may get New Opportunity in BJP Organizational reshuffle)