गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह? हायकमांडला रात्रीच अहवाल पाठवला जाणार

| Updated on: Mar 23, 2021 | 8:44 PM

महाराष्ट्र सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसचीही बदनामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींबाबत काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती मिळतेय.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह? हायकमांडला रात्रीच अहवाल पाठवला जाणार
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चिलं जात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसचीही बदनामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींबाबत काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून अहवाल मागवला आहे.(Meeting of Congress leaders on the issue of resignation of Anil Deshmukh)

हायकमांडच्या आदेशानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैठक होतेय. त्यात मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी ते त्यांनी टाकलेला लेटर बॉम्ब यावरुन काँग्रेसच्या होत असलेल्या बदनामीवर चर्चा केली जात आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र देशमुखांना क्लीन चिट दिलीय. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं कळतंय.

काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

गृहमंत्र्यांवर होत असलेले आरोप खोटे आणि बेछूट असल्याचा एका गटाचा सूर आहे. त्यामुळे देशमुखांचा राजीनामा नको, अशी भूमिका या गटाने मांडल्याचं ऐकण्यात येत आहेत. तर दुसरीकडे चौकशी होईपर्यंत देशमुखांनी पदमुक्त होणे महाविकास आघाडीच्या हिताचं असल्याचा सूर दुसऱ्या गटाचा आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचंही सूत्रांकडून कळतंय.

गेल्या काही दिवसात विविध प्रकरणावरुन भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यात महाविकास आघाडी कमी पडत असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचं समजतंय. फडणवीसांचे बेछूट, राजकीय आरोप खोटे तरीही राष्ट्रवादीचे मंत्री बोलत का नाहीत? असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीनंतर आज रात्रीच सविस्तर अहवाल हायकमांडला पाठवला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलीय.

‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Parambir Singh : ‘मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन केलेली बेकायदेशीर बदली रद्द करा’, परमबीर सिंगांच्या मागणी

मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली?, कुणी केली? वाझेंचा संबंध काय?; वाचा, ATS नं काय सांगितलं?

Meeting of Congress leaders on the issue of resignation of Anil Deshmukh