अमरावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने आता यूटर्न घेतल्याचं पहायला मिळतंय. इतकंच नाही तर त्या तरुणीने आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानंतर आता मेहबुब शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी चित्रा वाघ यांना थेट नार्को टेस्टचं आव्हान दिलंय. चित्रा वाघ या मुलींवर दबाव टाकून खोटं बोलून घेतात. हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला (Narco test) सामोरं यावं, मी ही तयार आहे. चित्रा वाघ यांचा भंकपपणा मला पाठ झाला आहे. खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं काम आहे, अशी टीकाही मेहबुब शेख यांनी केलीय. ते आज अमरावतीत बोलत होते.
मेहबुब शेख म्हणाले की, या प्रकरणात अनेक गंभीर गोष्टी आहेत. त्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तिला जीवे मारायचं आणि तो आरोप मेहबूब शेखवर लावायचा, त्याला अटक करायची असा कट होता. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, माझी नार्को टेस्ट करा, हे सर्व खोटं आहे. शेवटी सत्याचा विजय झाला. उसके घरमे दे रहै लेकिन अंधेर नही. चित्रा वाघ आणि सुरेश धस यांनी मला गोवण्यासाठी किती कट केले हे यातून दिसून येतं. राजकीय जीवन आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होता. अशा गोष्टीला चित्रा वाघ आणि सुरेश धस सारखे व्यक्ती मार्गदर्शन करत आहेत याचं नवल वाटतं.
या लोकांसोबत कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मी काम केलं. पण हे लोक इतक्या खालच्या पातळीला जातील असं वाटलं नव्हतं. आपला सहकारी पक्ष बदलत नाही म्हणून एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर केलाय. चित्रा वाघ मुलींवर दबाव टाकून खोटं बोलून घेतात. हिंमत असेल तर त्यांनी नार्को टेस्टला सामोरं जावं, मी ही तयार आहे. नवऱ्याच्या लाचखोरी प्रकरणावर चित्रा वाघ कधी बोलत नाहीत. त्याला कधी नितिमत्ता शिकवत नाहीत. मुलगी खरं बोलायला लागते तेव्हा चित्रा वाघ यांचा दबाव असतो. चित्रा वाघ यांचा भंपकपणा मला पाठ झालाय. खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं काम आहे. चित्रा वाघ यांचा नवरा मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खातो. कायदेशीर मार्गाने पुढील लढाई लढणार, असंही शेख यांनी स्पष्ट केलंय.