मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट, असं चित्र सध्या निर्माण झालंय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची (shivsena) धडपड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेकडे नेमके किती खासदार असा प्रश्न उभा राहिलाय. तर पुन्हा एकदा संख्याबळाविषयी चर्चा रंगली आहे. कुणाकडे नेमके किती आमदार आणि खासदार, याचं गणित काही सुटेना.
खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
‘फोडाफोडीचे राजकारण करत बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. ते म्हणत आहेत की मी शिवसैनिकांच्या पाठीत वार केला. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे मी पाठीत वार करणार नाही. मी समोर येऊन निर्णय घेणारा आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत मला एकटं करायंचं ठरवलं आहे. आणि त्याला तुम्ही बळी पडत आहात. आज जे निवडूण आलेत त्यांना फोडले जात आहे. मात्र निवडून देणाऱ्यांना विकत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांना फोडू शकत नाही. आता जे तुमच्या सोबत येत असतील तर घेऊन जा, द्या त्यांना पैसा नाहीतर धमकी. पण तुम्ही निवडून देणाऱ्यांना कसं धमकावणार? त्यांना कसं विकत घेणार? त्यांना कसं फोडणार?,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय.