Rajya Sabha election : MIMचं ठरलं! महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय, राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली

| Updated on: Jun 10, 2022 | 8:20 AM

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Rajya Sabha election : MIMचं ठरलं! महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय, राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली
इम्तियाज जलील, खासदार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha election) काही तास आधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतांवरुन मतभेद होणयाची देखील चिन्ह आहेत. तशी नाराजी खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानं सध्या राज्यात चर्चेला उधाण आलंय. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. ऐन क्षणी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. 42 मतांचा कोटा शरद पवारांनी 44 केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मतांचा कोटा बदलल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर यातच आता एक नवी बातमी आली असून एमआयएमनं महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

एमआयएमची भूमिका काय?

राज्यातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करताना एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत. आम्ही महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेसोबत आमचे राजकीय, वैचारीक मतभेद कायम असतील,’ असं ट्विट खासदार इम्तियाज जलील यांनी करून त्यांची एमआयएमची  भूमिका स्पष्ट केली आहे.

इम्तियाज जलील यांचं ट्विट

आज राज्यसभेचं मतदान

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अवघे काही तास आधी कोटा शरद पवार यांनी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहेत. आता या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या मतभेदाचे परिणाम काय होतात? आघाडीत पुन्हा बिघाडी होते का? हे येत्या काळातच कळेलं.