अकोला : अकोला जिल्हात पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुका ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ अर्थात एमआयएम स्वबळावर लढणार आहे. या निवडणुकीत एमआयएमकडून सर्व धर्म आणि सर्व समाजातील उमेदवरांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जमील खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना जमिल खान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने मुस्लिमांकडे केवळ मतदार म्हणूनच पाहिले,अशी टीका त्यांनी केलीय. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग, वॉर्ड रचनेचे प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांनीही कंबर कसायला सुरुवात केलीय. (MIM will contest municipal elections in Akola district on its own)
‘एमआयएमकडे नेहमी एका विशिष्ट धर्मियांचा पक्ष म्हणून पाहणं चुकीचं आहे. मुळात ते सत्य नाही, औरंगाबदसह अन्य ठिकाणी अन्य धर्मीय उमेदवार एमआयएकडून विजयी झाले आहेत. आता लवकरच संसदीय समिती गठीत करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम पूर्ण शक्तीने लढणार. तसंच सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार’, अशी माहिती जमील खान यांनी दिलीय. आगामी निवडणुकांसाठी लवरकच पक्षाची संसदीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात बाळापूर आणि अकोट नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला एमआयएम चे पदाधिकारी उपस्तीत होते.
पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ (One ward one corporator) पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महानगरपालिकांमध्ये सध्या एक प्रभाग चार नगरसेवक पद्धत प्रचलित आहे. ही पद्धत युती सरकारने सुरू केली होती. आता पुन्हा एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महापालिका निवडणुका एक प्रभाग एक सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.
इतर बातम्या :
MIM will contest municipal elections in Akola district on its own