‘मविआ’त मुंडकी खाणारा डायनासॉर सत्तारांचा अजित पवारांवर निशाणा, तर अजित पवार म्हणतात सत्तार…

| Updated on: Sep 30, 2022 | 10:14 AM

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

मविआत मुंडकी खाणारा डायनासॉर सत्तारांचा अजित पवारांवर निशाणा, तर अजित पवार म्हणतात सत्तार...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.  अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) देखील टीका केली आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, आम्ही तेव्हाच आमच्या नेत्याला म्हटलो होतो,  साहेब जर आपल्याला शिवसेना वाचावायची असेल तर तुम्हाला उठाव कारवा लागेल.  कारण महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

सत्तारांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

अब्दुल सत्तारांच्या टीकेचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.  सत्तारांच्या टीकेला महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. या सर्वांवरून लक्ष हटवण्यासाठीच असे बेताल वक्तव्य केली जातात. प्रसार माध्यमांंनी देखील अशा व्यक्तव्यांना प्रसिद्धी देण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

विजय शिवतारेंची टीका

दुसरीकडे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरूच आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी तर उद्धव ठाकरेंनी केल्याचा घणाघात शिवतारे यांनी केला आहे. यावेळी शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या एका वक्तव्याचा दाखला देखील दिला.  बाळासाहेब म्हणायचे कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे.