तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे, भुजबळ यांची जरांगे यांच्यावर टीका

| Updated on: Feb 17, 2024 | 4:23 PM

प्रफुल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून भुजबळ यांनी तांत्रिक कारणामुळे तिथे त्यांना राजीनामा देवून पुन्हा निवडून यावे लागणार होते. आमदार अपात्रता नोटीसमधून ते आता मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्या नोटीसीत आता काही अर्थ राहिलेला नाही.आता त्यांच्या जागेवर उर्वरित काळासाठी दोन महिन्यांनी आमचा दुसरा उमेदवार निवडून येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे, भुजबळ यांची जरांगे यांच्यावर टीका
bhujbal and jarange
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नाशिक | 17 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल आला असून आता 20 तारखेला विधीमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणा संदर्भात कायदा केला जाणार आहे. जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले होते. उपोषणादरम्यान त्यांची तब्येत ढासळल्याने सलाईन देखील लावण्यात आले होते. जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांनी लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याउपोषणावरुन त्यांच्यावर पुन्हा उपरोधीक टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील मोठा नेता आहे. तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे…अरे हे काय चाललंय काय, दुकाने बंद करा, गाड्या जाळा. हे काय टोळ्यांचे राज्य आहे का ? बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेले हे लोकशाहीचे महाराष्ट्र राज्य आहे. हे मंत्र्यांनी अन् पोलिसांनी दाखवून दिले पाहिजे, कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. कायदा जर कुणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मग तो लहान नेता असो वा मोठा नेता असो किंवा कोणत्याही समाजाचा नेता असो अशी टीका जरांगे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

जरांगे यांना पाणी घ्यावेच लागते

कोणी महाराज येतात, कोणी मंत्री येतात, कोणी राजे येतात, मग त्यांना पाणी घ्यावंच लागते. परत पाणी सोडावे लागते. परत परत ते चालूच असतं. जोपर्यंत आहेत, तुम्ही आहात तोपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहील मलातरी तो कार्यक्रम थांबेल असे वाटत नाही अशी टीका भुजबळ यांनी जरांगे यांच्या उपोषणावर केली आहे. जरांगे सरकारी मंत्री असो किंवा अधिकारी यांना शिवीगाळ करीत आहेत. एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

शिंदे गटा एवढ्या जागा हव्या

भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या शाब्दीक लढाईबद्दल बोलताना शाब्दीक लढाईत पण थोडं सांभाळून बोलायला हवे. भास्कर जाधव हे नारायण राणे यांच्या कुटुंबाला वाटेल ते बोलताहेत..तर राणेही अरे ला कारे उत्तर देणारच. भास्कर जाधव यांनी स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. 20 तारखेनंतर महायुतीतील लोकसभेचे उमेदवार हळूहळू ठरतील. तशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी चार जागा राष्ट्रवादीच्या होत्या, त्या जागेवर राष्ट्रवादी दावा करणारच. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अजित फाईल लगेच मार्गी लावतात

अजित पवारांनी ओबीसीचा निधी मंजूर केला नसल्याचे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तपशील मिळाल तर विचारता येईल त्यावर, आपल्या तर असे काही माहीत नाही. परंतू अजित पवार यांच्याकडे फाईल दिली तर लगेच ती मार्गी लागते असे भुजबळ यांनी सांगितले. शरद पवार यांनी पक्ष काढून घेतल्याचा आरोप केला आहे, याबाबत विचारता हे कायद्यात ते धरून आहे की नाही ते सर्वोच्च न्यायालयात निश्चित होईल, सुप्रीम कोर्टात जजेस आणि कायदे पंडीत बसलेले आहेत. सुप्रीम कोर्टात ते जात आहेत ना असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.