नाशिक : राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झालीये. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. (Minister Chhagan Bhujbal tested Corona Positive)
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. भुजबळांबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच धाकधुक वाढली आहे.
शिवजयंतीदिनी (19 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खान्देशातील राष्ट्रवादीचे बडे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
याआधीदेखील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्यास रुग्णाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. या भीषण संकटाची जाणीव ठेवून राष्ट्रवादीने जनता दरबार पुढच्या दोन आठवड्यांसाठी स्थगित केला आहे.
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काहींना तर दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणजेच 55 टक्के मंत्री कोरोनाच्या तावडीत सापडले. तर राज्यमंत्री आहेत 10 त्यांच्यापैकी 7 मंत्र्यांनी कोरोना झाला, म्हणजेच महाविकास आघाडीतील राज्यमंत्र्यांना कोरोना होण्याचं प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. या दोघांची मिळून टक्केवारी काढली तर एकूण मंत्रिमंडळापैकी 50 टक्क्यांहून अधिक मंत्रिमंडळ कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं दिसतं.
हे ही वाचा :
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित