शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आणि…. शिंदे गटाच्या नेत्यांचा कॉन्फीडन्स वाढला

| Updated on: Oct 09, 2022 | 12:09 AM

शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळणार असा दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आणि.... शिंदे गटाच्या नेत्यांचा कॉन्फीडन्स वाढला
Follow us on

मुंबई :  शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. सोमवारी दोन्ही गटांना मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत. यावर आता दोन्ही गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांचा कॉन्फीडन्स चांगलाच वाढला आहे. शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळणार असा दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी चिन्ह गोठावलं गेल आहे. शिवसेना आमची आहे हा आमचा क्लेम अगदी योग्य आहे असा दावा केसरकर यांनी केला आहे.

70 टक्केपेक्षा जास्त नेते, कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. बीकेसीतील दसरा मेळाव्याला तिप्पट संख्येने लोक उपस्थित होते. शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब हे समीकरण आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जायला नकार दिला आहे. ही वस्तुस्थिती आम्ही निवडणूक आयोगासमोर घेऊन जाऊ. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू.

दुसऱ्या चिन्हाचा विचार करायचा असेल तर शिंदे साहेब सर्वांशी चर्चा करतील. आपला निर्णय घ्यायचा आणि तो दुसऱ्यांवर लदायचा असं आता होत नाही.

शिवसैनिकांनी आपल्या सोबत फरफटत यावे अशी आता परिस्थिती राहिली नाही असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पोटनिवडणुकीत सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतचे आमची युती तुटली असं सांगण्याची त्यांची हिंमत नाही. शिवसेना-भाजपची युती कायम आहे. ही युक्ती पोटनिवडणूक जिंकेल.

निवडणूक आयोग की घटनात्मक संस्था आहे. आपल्या बाजूने निर्णय लागला की कोर्ट चांगलं. आपल्या विरोधात लागला की एकतर्फी असं म्हणणं चुकीचं आहे. अशा संस्थां जो निर्णय देतात तो मान्य केला पाहिजे.

शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आणि धनुष्यबान ही आम्हालाच मिळणार याची खात्री आहे असेही दीपक केसरकर म्हणाले.